Mahavitaran Recruitment 2024 : महावितरण कंपनीमध्ये 5 हजार 815 जागांसाठी भरती; नवीन प्रसिध्दीपत्रक जाहीर

Mahavitaran Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळसेवा भरती अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक (लेखा), विद्युत सहाय्यक, पदवीधर शिकाऊ अभियंता (वितरण)/ (स्थापत्य) पदे भरण्यासाठी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिराती प्रसिध्द करण्यात आल्या असून, आता नवीन प्रसिध्दीपत्रक जाहीर करण्यात आले आहे.

$ads={1}

महावितरण कंपनीमध्ये 5 हजार 815 जागांसाठी भरती; नवीन प्रसिध्दीपत्रक जाहीर

Mahavitaran Recruitment 2024

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळसेवा भरती अंतर्गत खालील नमूद पदे भरण्यासाठी दि. २९/१२/२०२३ रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिराती प्रसिध्द करण्यात आल्या होत्या, तसेच याबाबत विविध वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्दी देण्यात आलेली होती.

  • पदाचे नाव : विद्युत सहाय्यक (Electrical Assistant)
  • एकूण जागा - 5347
  • पदाचे नाव: कनिष्ठ सहाय्यक (लेखा) Junior Assistant (Accounts)
  • एकूण रिक्त जागा : 468

ऑनलाईन अर्जाची नोंदणी करण्याकरीताची वेबलिक (URL Link) कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २०/०३/२०२४ अशी होती व त्यानंतर १९/०४/२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तथापि, बहुतांश उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरीता मुदतवाढ देणेबाबत विनंती केली आहे. 

सबब, उक्त पदाकरीता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २०/०५/२०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याकरीताची वेबलिंक, रिक्त पदे, शेक्षणिक अर्हता, अटी व शती, सविस्तर जाहिराती कंपनीच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे. मूळ जाहिरात येथे पहा

Previous Post Next Post