RTE Admission Date Extension : आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी या तारखेपर्यंत पर्यंत मुदतवाढ

RTE Admission Date Extension : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल, वंचित शैक्षणिक व सामाजिकदृष्टया मागासवर्ग घटकाकरिता आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकाना ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे.

$ads={1}

आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी या तारखेपर्यंत पर्यंत मुदतवाढ

RTE Admission Date Extension

दरवर्षीप्रमाणे सुधारित अधिसूचना दिनांक ०९.०२.२०२४ नुसार सन २०२४-२५ या वर्षाची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन राबविण्यात येत असून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रीयेंतर्गत दिनांक १६ एप्रिल २०२४ ते ३० एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये पालकांना प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. 

आता पालकांना आरटीई २५ टक्के प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता दिनांक १० मे २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी 45 हजार 407 ऑनलाईन अर्ज

राज्यात RTE च्या 76 हजार 53 शाळांमध्ये 8 लाख 86 हजार 411 जागा असून, आतापर्यंत राज्यातील आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी 64 हजार 506 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. आता आरटीई 25 टक्के अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 10 मे पर्यंत तारीख वाढवून देण्यात आली आहे.

आरटीई प्रवेशासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा का दिसत नाही? काय आहे कारण

मोठी बातमी! दहावी-बारावीचा निकाल या तारखेला जाहीर होणार
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा