Employees Transfer : गुड न्यूज! राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या बदली करण्याबाबतची स्थगिती उठवली; नवीन सूचना निर्गमित शासन परिपत्रक

Employees Transfer : मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशास अनुसरुन शासन परिपत्रक, दि.१ डिसेंबर २०२२ अन्वये दिलेली स्थगिती रद्द करुन त्यानुषंगाने अनुसरावयाच्या कार्यपध्दतीबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

$ads={1}

राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या बदली करण्याबाबतची स्थगिती उठवली; नवीन सूचना निर्गमित शासन परिपत्रक

Employees Transfer

राज्यातील खाजगी शाळेतील शिक्षकांचे विनाअनुदानित/अंशतः अनुदानित वरुन अनुदानित/अंशतः अनुदानित पदावर बदली करण्याबाबतची अधिसूचना दि.८ जून २०२० मधील नियम क्र. ५ उपनियम (४१-१) व शासन निर्णय, दि.१ एप्रिल २०२१ यास शासन परिपत्रक, दि.१ डिसेंबर २०२२ अन्वये दिलेली स्थगिती उठविण्यात आली आहे.

आता त्यानुषंगाने क्षेत्रीय सक्षम प्राधिकाऱ्यांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत. 

शासन परिपत्रक, दि.०१.१२.२०२२ च्या विरोधात दाखल रिट याचिकांप्रकरणी मा. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अनुपालन करण्यासंदर्भात शासन अधिसूचना, दि.०८.०६.२०२० व शासन निर्णय, दि.०१.०४.२०२१ मधील तरतूदीप्रमाणे व प्रचलित कार्यपध्दती अनुसरुन सर्व संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी पुढील उचित कार्यवाही करावी.

तसेच, विनाअनुदानित/अंशतः अनुदानित वरुन अनुदानित/अंशतः अनुदानित पदावर बदली संदर्भातील उर्वरित न्यायालयीन प्रकरणे ज्यामध्ये मा. न्यायालयाने आदेश पारित केलेले नाहीत आणि न्यायालयीन प्रकरणे दाखल न झालेली उपरोक्तप्रमाणे बदलीची प्रलंबित प्रकरणे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी शासन स्तरावर निर्णयार्थ सादर करण्यात यावीत.

तसेच, वरील नियमानुसार करण्यात येणाऱ्या बदल्यांची प्रकरणे सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांनी पुढील आदेशापर्यंत शासनाच्या मान्यतेस्तव सादर करावीत.

राज्यातील केंद्र पुरस्कृत योजनेतील कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन मंजूर

राज्यातील खाजगी शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीवर बंदी असतानाच्या कालावधीत शासन अधिसूचना, दिनांक ८ जून २०२० अन्वये मूळ नियमावलीत समाविष्ट करण्यात आलेला उपनियम क्र. (४१-१) व त्याअनुषंगाने निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय, दिनांक १ एप्रिल २०२१ मधील तरतूदींचे पालन न करता विनाअनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळा अथवा तुकडीमधून अनुक्रमे अंशतः अनुदानित किंवा पूर्णतः अनुदानित शाळा अथवा तुकडीतील रिक्त पदावर बदली होत असल्याची बाब निदर्शनास आल्याने यास पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. आता दिनांक २९ एप्रिल २०२४ रोजीच्या शासन परिपत्रकान्वये ही स्थगिती उठवण्यात आली आहे. (शासन परिपत्रक)

सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ! महत्वाचे शासन परिपत्रक जारी

मोठी बातमी! जेईई परीक्षेचा निकाल जाहीर, राज्यातील या विद्यार्थ्यांची जेईई परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी

कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी नवीन परिपत्रक जारी

$ads={2}

गुड न्यूज! रोजंदारी कर्मचारी शासन सेवेत कायम शासन निर्णय जारी

आरटीई 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटचे दोन दिवस

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post