Pension Scheme : आनंदाची बातमी! राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन योजनेसंदर्भात महत्वाचा शासन निर्णय!

Pension Scheme : दिनांक १ नोव्हेंबर, २००५ पूर्वी शासन सेवेत कार्यरत असलेल्या किंवा त्यानंतर राज्यातील दुसऱ्या निवृत्तीवेतनार्ह सेवेत रुजू झालेल्या ज्या कर्मचाऱ्यांची नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेखाली वर्गणी कपात करण्यात आली आहे, अशा कर्मचाऱ्यांना अंशदानाच्या रकमा परत करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबतचा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

$ads={1}

आनंदाची बातमी! राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन योजनेसंदर्भात महत्वाचा शासन निर्णय!

Pension Scheme

दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाच्या दिनांक ३१ ऑक्टोबर, २००५ च्या शासन निर्णयान्वये, नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना अंमलात आली आहे. 

या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती वित्त विभागाच्या दिनांक ७ जुलै, २००७ शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेली आहे. या शासन निर्णयातील परिच्छेद-२४ अनुसार कर्मचाऱ्याचा मृत्यु झाल्यास अथवा नियत वयोमान (यथास्थिती ५८/६० वर्षे), सेवात्याग केल्यास सेवान्त लाभ देण्यासंबंधीच्या तरतुदी स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील, असे नमूद करण्यात आले आहे.

दिनांक १८ ऑगस्ट, २००९ च्या परिपत्रकानुसार अशा कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ च्या तरतूदी लागू ठरल्या आहेत, अशा सर्व प्रकरणांत अंमलात आणावयाची कार्यपद्धती वित्त विभागाच्या दिनांक १२ नोव्हेंबर, २०१० च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेली आहे. 

सदर शासन निर्णयातील परिच्छेद-६ अनुसार सदर कार्यपद्धती जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषित्तर विद्यापिठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये तसेच कृषि विद्यापिठे इत्यादींमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारांसह लागू करण्यात आली आहे.

त्यानुसार आता सदर तरतुदी दिव्यांग कल्याण विभागाच्या नियंत्रणाखालील दिव्यांगांच्या १०० टक्के अनुदानित विशेष शाळा, कार्यशाळा, मतिमंद मुलांची बालगृहे यांमधील १०० टक्के अनुदानित पदांवरील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आल्या आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ! महत्वाचे शासन परिपत्रक जारी

दिव्यांग कल्याण विभागाच्या नियंत्रणाखालील ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) लागू आहे, अशा कर्मचाऱ्यांना खालील परिस्थितीत अंशदानाच्या रकमा परत करण्याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

  1. कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यु झाल्यास,
  2. कर्मचाऱ्याने नियम वयोमानापूर्वी (यथास्थिती ५८ / ६० वर्षे) सेवात्याग केल्यास,
  3. कर्मचारी नियत वयोमानानुसार (यथास्थिती ५८ / ६० वर्षे) सेवानिवृत्त झाल्यास,
  4. दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर राज्यातील दुसऱ्या सेवेत रुजू झालेल्या ज्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२ च्या तरतुदी लागू ठरल्या आहेत, अशा कर्मचाऱ्यांची नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेखाली वर्गणी कपात करण्यात आली असल्यास,
  5. परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत अंशदानाची जमा होणारी रक्कम तसेच परताव्याची खर्च होणारी रक्कम खालील लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावी. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. (शासन निर्णय)
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा