Employees Promotion GR : राज्य शासकीय सेवेमध्ये पदोन्नतीसाठी पात्र शासकीय अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नती देण्याकरीता अनुसरावयाच्या कार्यवाहीबाबत आता नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे, सविस्तर वाचा..
$ads={1}
राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात नवीन शासन निर्णय जारी
राज्य शासकीय सेवेमध्ये पदोन्नतीसाठी पात्र शासकीय अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नती देण्याकरीता अनुसरावयाच्या कार्यवाहीबाबतची एकत्रित मार्गदर्शक तत्वे सामान्य प्रशासन विभागाच्या दि. १ ऑगस्ट २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्गमित केली आहेत.
सदर शासन निर्णयानुसार बिगर मंत्रालयीन संवर्गातील आस्थापना मंडळाच्या कार्यकक्षेत नसलेल्या गट-अ ते गट-ड मधील सर्व पदांवर पदोन्नतीकरीता संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे प्रधान सचिव / सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय पदोन्नती समितीची तरतूद करण्यात आली आहे. आता त्यास अनुसरून विभागीय पदोन्नती समितीचे गठन करण्यात आली आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ०१.०८.२०१९ मध्ये दिलेल्या सुचनांनुसार दिव्यांग कल्याण विभागाच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रीय कार्यालयासाठी ६ व्या वेतन आयोगानुसार ज्या पदांचे ग्रेड वेतन रू. ७५९९/- किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा सर्व पदांसाठी तसेच आस्थापना मंडळाच्या कार्यकक्षेत नसलेल्या गट-अ ते गट-ड मधील सर्व पदांवर पदोन्नतीकरीता खालीलप्रमाणे विभागीय पदोन्नती समिती गठीत करण्यात आली आहे.
विभागीय पदोन्नती समितीचे कार्यक्षेत्र
- पदोन्नतीची शिफारस करण्यासाठी प्रस्ताव विचारात घेणे व सेवा प्रवेश नियमाच्या तरतूदीनुसार व सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना विचारात घेवून, पदोन्नतीसाठी पात्र अधिकाऱ्यांची निवडसूची तयार करून नियुक्ती प्राधिकाऱ्यास पदोन्नतीसाठी शिफारस करणे.
- मानीव दिनांकाचे प्रस्ताव विचारात घेणे व सेवा प्रवेश नियमाच्या तरतूदीनुसार व सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश / मार्गदर्शक सूचना विचारात घेवून पदोन्नतीचा मानीव दिनांक देण्यासाठी नियुक्ती प्राधिकाऱ्यास शिफारस करणे.
सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ! महत्वाचे शासन परिपत्रक जारी