Daily Employees Regularization : वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कार्यालयातील रोजंदारी म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची ८ वी उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता शिथील करून, शासन सेवेत नियमित करण्याचा महत्वपूर्ण शासन निर्णय दिनांक १८ मार्च २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
$ads={1}
या रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा शासन सेवेत नियमित!
वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, धाराशिव या कार्यालयात श्री. हनुमंत दगडू सातपुते हे रोजंदारी वाहनचालक म्हणून कार्यरत आहेत. यांनी त्यांना शासन सेवेत नियमित करणेबाबत मा. न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती.
त्यामध्ये श्री सातपुते हे दीर्घकालीन सेवेत असतील व त्यांना समायोजित करता येणे शक्य असेल तर ८ वी उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता शिथील करून नियमितपणाचे लाभ देण्याबाबत योग्य ते आदेश निर्गमित करणेबाबत मा. उच्च न्यायालयाने दि.२० जून २०१९ रोजीचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित आस्थापनेवर घेण्याचा निर्णय संबंधित विभागांचे अभिप्राय घेऊन साधकबाधक विचाराअंती मा. मंत्रीमंडळाच्या मान्यतेने घेण्यात आलेला असून, त्याअनुषंगाने २६ रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात आलेले आहे.
त्याच धर्तीवर रोजंदारीवरील कर्मचा-यांबाबत मा. मंत्रीमंडळाच्या मान्यतेने निर्गमित शासन निर्णय दि. १ एप्रिल २०१५ नुसारचे सर्वसाधारण धोरण व मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने श्री हनुमंत सातपुते, रोजंदारी वाहनचालक यांना शासनः सेवेत नियमित करण्याचा निर्णय अखेर पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे.
मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महत्वपूर्ण निर्णय
श्री हनुमंत दगडू सातपुते, रोजंदारी वाहनचालक, यांचे प्रकरणी मा. उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजी नगर यांनी रिट याचिका मध्ये दि. २० जून २०१९ रोजी दिलेले अंतिम आदेश व दि.१ एप्रिल २०१५ चा शासन निर्णय विचारात घेता, श्री सातपुते हे केवळ ४ थी उत्तीर्ण असले तरी ते दि. १५ एप्रिल १९८९ पासून सलग रोजंदारी सेवेवर कार्यरत असल्याचे विचारात घेऊन, मा. उच्च न्यायालयाने त्यांची ८ वी उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता शिथिल करणेबाबत दिलेल्या निर्देशास अनुसरून ८ वी उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता केवळ या प्रकरणी शिथिल करून मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या दिनांकापासून म्हणजेच दि.२० जून २०१९ पासून उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, छत्रपती संभाजी नगर या विभागात वाहन चालक या पदावर श्री सातपुते यांना समायोजित करण्यास दिनांक १८ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग शासन निर्णय दि. २४ एप्रिल २०२३ अन्वये भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचा आकृतीबंध सुधारित करण्यात आला असून, वाहन चालक हे पद मृत संवर्ग म्हणून घोषित करण्यात आले असल्याने, श्री सातपुते यांना तत्कालीन स्थितीत ज्या रिक्त पदावर समायोजित करण्यात येईल ते पद सुधारित आकृतीबंधाच्या दि. २४ एप्रिल २०२३ पासून मृत संवर्गात गणण्यात येईल व सेवानिवृत्ती/राजीनामा अथवा अन्य कारणास्तव रिक्त झाल्यास पद व्यपगत होईल.
कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू, शासन निर्णय जारी
वर्ग-३ व वर्ग-४ या पदांच्या नियुक्तीबाबतचे अधिकार आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांना आहेत. आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे यांनी श्री हनुमंत सातपुते यांचे प्रकरणी मा. उच्च न्यायालयाने दिलेले आदेश विचारात घेऊन श्री हनुमंत सातपुते यांच्या सेवा नियमित करण्याचे आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. (शासन निर्णय)
मोठी बातमी! नवीन शैक्षणिक वर्षांपासून आता सर्व शाळांमध्ये 'हा' उपक्रम
कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय!