गुड न्यूज! राज्यातील या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू, शासन निर्णय जारी

6th Pay Commission Pay Scale : कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याचा महत्वपूर्ण शासन निर्णय दिनांक १८ मार्च २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला असून, आता शासन निर्णयात नमूद संवर्गातील सदर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे.

$ads={1}

राज्यातील या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू, शासन निर्णय जारी

6th pay commission pay scale

दि.१ जानेवारी २००६ पासून श्रमिक विद्यापीठ, नागपूर या संस्थेत कार्यरत असलेल्या व तद्नंतर सेवानिवृत्त झालेल्या खाली नमूद केलेल्या संवर्गातील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार पुढीलप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

6th Pay Commission Pay Scale

उपरोक्त तपशिलात नमूद केल्याप्रमाणे देय ठरणाऱ्या सुधारित वेतनश्रेणीनुसार श्रमिक विद्यापीठ, नागपूर येथील कार्यरत ३ संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या थकबाकीचे देय लाभ वितरीत करण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे, याबाबतचा शासन निर्णय दिनांक १८ मार्च २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, खंडपीठ नागपूर येथे दाखल मूळ अर्ज दि. २६ ऑगस्ट २०१५ रोजीचे आदेश, अवमान याचिका मधील दि.१ डिसेंबर २०१८ रोजीचे आदेश, अवमान याचिका दि.०६.१०.२०१६ रोजीचे आदेशानुसार तसेच शिक्षण संचालक (योजना) यांच्या दि.१६ सप्टेंबर २०२२ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार सदर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या संस्थेचे श्रमिक विद्यापीठामध्ये रुपांतर करताना समाज शिक्षण संस्थेच्या आस्थापनेवरील निर्माण करण्यात आलेल्या पदांना शासकीय कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असणारे वेतन व भत्ते लागू केले होते. त्यानुसार सदर संस्थेतील कर्मचाऱ्यांना वेळोवेळी बडकस आयोग, भोळे आयोगानुसार सुधारित केलेल्या वेतनश्रेण्या लागू केलेल्या आहेत.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरीत समावून घेण्याचा शासन निर्णय!

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा