DA Hike Latest News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे, त्यानुसार आता त्याचधर्तीवर राज्य सरकारने महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढ करण्याबाबतचा एक महत्वपूर्ण शासन निर्णय दिनांक १३ मार्च २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
$ads={1}
राज्यातील या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्यात वाढ; मूळ वेतनाच्या 50 टक्के दराने मिळणार महागाई भत्ता
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात (Dearness Allowance) भरघोस वाढ करण्यात आली असून, आता या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मूळ वेतनाच्या ५० टक्के झाला आहे. तसेच ग्रॅच्युइटी, प्रवास, कँटीन व प्रतिनियुक्ती भत्यात देखील वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील 'या' सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्यात वाढ
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक १ जानेवारी २०२४ पासून लागू करण्यात आलेला ४ टक्के वाढीव दराने महागाई भत्ता (Dearness Allowance) व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू करण्यात आले आहे. त्यानुसार दि. १ जानेवारी २०२४ पासून ५०% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय असणार आहे.
केंद्राच्या पाठोपाठ 'आता' राज्य सरकारच्या निर्णयाकडे लक्ष
महागाई भत्ता हा वर्षातून दोनदा वाढवण्यात येतो, हा Dearness Allowance निश्चित करण्यासाठी अखिल भारतीय घाऊक दर निर्देशांक आकडेवारी नुसार कामगार ब्युरो, कामगार आणि रोजगार मंत्रालयाचा एक विभाग, केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करण्यात येतो,
नुकताच राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ करण्यात आली आहे. आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीचा निर्णयाकडे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले असून, लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (शासन निर्णय)
कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरीत समावून घेण्याचा शासन निर्णय!
कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू, शासन निर्णय जारी
खुशखबर! राज्यातील या कर्मचाऱ्यांची ‘ही’ मागणी अखेर ,मान्य! शासन निर्णय जारी
$ads={2}