Employees Advance Salary : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मार्च महिन्याच्या पगारासंदर्भात महत्वाचे परिपत्रक जारी

Employees Advance Salary : रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती निमित्त माहे मार्च २०२४ च्या वेतनासंदर्भात आता महत्वाचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

$ads={1}

कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! मार्च महिन्याच्या पगारासंदर्भात महत्वाचे परिपत्रक जारी

Employees Advance Salary

रमजान ईद सण व डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर जयंती सणापूर्वी माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत आदेश संबंधित विभागांना कळविण्यात आले आहे.

अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, मालेगाव यांनी निवेदनामध्ये नमूद केलेल्या मागणीच्या अनुषंगाने तसेच आगामी रमजान ईद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त माहे मार्च २०२४ चे वेतन एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात होण्याबाबत यथानियम कार्यवाही करण्याची व संबंधितांना कळविण्याबाबत महत्वाचे परिपत्रक शिक्षण आयुक्तालय कार्यालयांकडून काढण्यात आले असून, संबंधित विभागांना कळविण्यात आले आहे. त्यामुळे आता मार्च महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Employee Advance Salary

मोठी बातमी! नवीन शैक्षणिक वर्षांपासून आता सर्व शाळांमध्ये 'हा' उपक्रम

खुशखबर! कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ‘दोन’ महत्वाचे शासन निर्णय जारी

राज्यातील या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्यात वाढ

दिनांक १ जानेवारी २०२४ पासून राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच निवृत्ती वेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्यात ४ टक्के वाढ (Dearness Allowance) करण्यात आली असून, आता या कर्मचाऱ्यांना ५०% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय असणार आहे.

आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीचा निर्णयाकडे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले असून, लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या योजनेतील या कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिनांकापासून थकीत मानधन मंजूर, शासन निर्णय

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा