Contractual Employees Accident insurance : बाहयस्त्रोताद्वारे कंत्राटी पध्दतीवर कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्राणांतिक अपघात झाल्यास मानवतावादी दृष्टीकोनातून कंत्राटी कामगारांच्या वारसास आर्थिक मदत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय महावितरण कंपनीकडून घेण्यात आला आहे.
$ads={1}
बाहयस्त्रोताद्वारे कंत्राटी पध्दतीवर कार्यरत कर्मचाऱ्यांना अपघात विमा लागू
महावितरण कंपनीच्या बाहेरील व्यक्तींचा विद्युत धक्क्यामुळे प्राणांतिक अपघात झाल्यास त्यांना कंपनीच्या वतीने रु. ४,००,०००/- (रु.चार लाख मात्र) तातडीची आर्थिक मदत देण्यात येते.
याच धर्तीवर आता बाहयस्त्रोताद्वारे कंत्राटी पध्दतीवर कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना कंपनीचे काम करीत असतांना प्राणांतिक अपघात झाल्यास मयत कंत्राटी कामगारांच्या वारसांना तातडीची आर्थिक मदत देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
बाहयस्त्रोताद्वारे कंत्राटी पध्दतीवर कार्यरत कर्मचाऱ्यांना 4 लाखाचा अपघात विमा मिळणार
आता, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी संचालक (वित्त), संचालक (संचलन) आणि संचालक (मासं) यांच्याशी विचारविनियम करुन महावितरण कंपनीमध्ये बाहयस्त्रोताद्वारे कंत्राटी पध्दतीवर कार्यरत कंत्राटी कामगारांचा प्राणांतिक अपघात झाल्यास मानवतावादी दृष्टीकोनातून कंत्राटी कामगारांच्या वारसास रु. ४,००,०००/- (रु.चार लाख मात्र) इतकी तातडीची आर्थिक मदत कंपनीकडून कंत्राटदारा मार्फत संबंधित नियंत्रण अधिकारी यांच्या उपस्थितीत अदा करण्यास मंजूरी प्रदान केलेली आहे.
कर्मचाऱ्यांची ‘ही’ मागणी अखेर मान्य! शासन निर्णय जारी
सदर आर्थिक मदत संबंधीत कंत्राटी कामगारास प्राणांतिक अपघात ज्या मंडलांतर्गत कार्यरत असतांना झालेला आहे, अशा मंडलाचे अधीक्षक अभियंता त्या मंडलाचे वरिष्ठ व्यवस्थापक (विवले)/ व्यवस्थापक (विवले) यांच्याशी विचारविनियम करुन मंजूर करण्यास सक्षम अधिकारी असणार आहे.
सदरचा निर्णय हा केवळ तातडीच्या मदतीपुरता मर्यादित असून, कंपनीवर इतर कोणतीही आर्थिक जबाबदारी राहणार नाही. असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
या योजनेतील या कर्मचाऱ्यांना नियुक्ती दिनांकापासून थकीत मानधन मंजूर, शासन निर्णय
मोठी बातमी! नवीन शैक्षणिक वर्षांपासून आता सर्व शाळांमध्ये 'हा' उपक्रम
रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा शासन सेवेत नियमित! शासन निर्णय