राष्ट्रीय आरोग्य अभियानातील या कर्मचाऱ्यांची ‘ही’ मागणी अखेर मान्य! शासन निर्णय जारी

National Health Mission GR : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दोन महत्वाचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत, त्यामध्ये बऱ्याच दिवसापासून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी मानधन वाढीसाठी आंदोलन केले होते, यासंदर्भात अखेर मानधन वाढीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत देखील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

$ads={1}

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील या कर्मचाऱ्यांची ‘ही’ मागणी अखेर मान्य! शासन निर्णय जारी

National Health Mission GR

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात राज्य मंत्रीमंडळाच्या दिनांक १३ मार्च २०२४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे.

  1. आशा स्वयंसेविका यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणा-या दरमहा रुपये ५०००/- या मानधनात दरमहा एकूण रुपये ५०००/- एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली.
  2. गट प्रवर्तक यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणा-या दरमहा रुपये ६२००/- या मानधनात दरमहा एकूण रुपये १०००/- एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली. 
  3. उपरोक्त प्रस्तावित केलेली वाढ नोव्हेंबर, २०२३ या महिन्यापासून देय होणा-या मानधनात अदा करण्यास मान्यता देण्यात आली.
  4. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षांमध्ये नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली रु.२०२.०४ कोटी इतक्या अतिरिक्त खर्चाची तरतुद पुरवणी मागणी अथवा नियमित तरतुदीतुन करण्यास मान्यता देण्यात आली.
  5. यासाठी होणा-या अंदाजे रुपये ९६५.४८ कोटी इतक्या वार्षिक आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आली. आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या मानधन वाढीनंतर येणा-या आवर्ती खर्चाची तरतुद आगामी अधिवेशनामध्ये अथवा नियमित तरतुदीतुन करण्यास मान्यत देण्यात आली.

सदर योजना सन २०२३-२४ या वित्तीय वर्षात दिनांक ०१.११.२०२३ पासून अंमलात येईल व त्यानुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सदर वाढीव मानधन दिनांक ०१.११.२०२३ पासून अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णय मा. मंत्रीमंडळाच्या दिनांक १३/०३/२०२४ रोजी झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने दिनांक १३/०३/२०२४ रोजीच्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आला आहे. (शासन निर्णय)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर

आरटीई 25 टक्के लेटेस्ट अपडेट पहा

राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेणार

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेतील मंजूर समकक्ष पदांवर सामावून घेण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याचा राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक १५ मार्च रोजी निर्गमित करण्यात आला आहे. (शासन निर्णय)

कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता अपघात विमा योजना लागू, परिपत्रक पहा

रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा शासन सेवेत नियमित! शासन निर्णय

मोठी बातमी! नवीन शैक्षणिक वर्षांपासून आता सर्व शाळांमध्ये 'हा' उपक्रम

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा