MPSC Examination Postponed : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर

MPSC Examination Postponed : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या सरळसेवा चाळणी परीक्षा संदर्भात महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले आहे.

$ads={1}

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २८ एप्रिल, २०२४ रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४, १९ मे, २०२४ रोजी होणारी समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या सरळसेवा चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत, यासंदर्भात महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले आहे.

MPSC Examination Postponed

सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता अधिनियम, २०२४ मधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता, शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर उपरोक्त नमूद परीक्षांच्या बाबतीतील पुढील घोषणा आयोगातर्फे करण्यात येणार असल्याचे आयोगामार्फत कळविण्यात आले आहे. या परीक्षांच्या सुधारित तारखा यथावकाश जाहीर करण्यात येणार आहे.

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संदर्भात नवीन परिपत्रक जारी

राज्यात तब्बल 17 हजार 499 पदांची पोलीस भरती सुरु, सविस्तर तपशील पहा

$ads={2}

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा