Police Bharti 2024 : तरुणांसाठी सुवर्णसंधी! राज्यात तब्बल 17 हजार 499 पदांची पोलीस भरती सुरु, सविस्तर तपशील पहा

Police Bharti 2024 : राज्यातील पोलीस भरती सुरु झाली असून, पोलीस शिपाई, पोलीस शिपाई (चालक), बॅण्डस्मन, पोलीस शिपाई (सशस्त्र), कारागृह शिपाई या पदांच्या तब्बल 17 हजार 499 जागांसाठी मोठी भरतीची जाहिरात काढण्यात आली आहे, यामध्ये दहावी, बारावी आणि पदवीधारकांना सुवर्णसंधी आहे, पोलीस भरतीचे ऑनलाईन अर्ज भरणे सुरु झाले असून, सविस्तर तपशील पाहूया.

$ads={1}

तब्बल 17 हजार 499 पदांची पोलीस भरती सुरु | Police Bharti 2024

Police Bharti 2024

पोलीस भरती-२०२४ ही महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकात पोलीस शिपाई / पोलीस शिपाई चालक / बॅण्डस्मन / राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई संवर्गात दिनांक ३१/१२/२०२३ अखेरपर्यंत रिक्त झालेल्या पदांची गणना करुन जाहीर करण्यात आलेली आहे. 

पोलीस भरतीच्या घटकनिहाय रिक्त पदांच्या एकूण जागा : 17499

  1. पोलीस शिपाई : 9595 जागा
  2. पोलीस शिपाई (चालक) : 1686 जागा
  3. पोलीस शिपाई (सशस्त्र) 4349 जागा
  4. बॅण्ड्समन पोलीस शिपाई : 69 जागा
  5. कारागृह शिपाई : 1800 जागा

महत्वाच्या तारखा

जाहिरातीत नमुद अर्हता व अटीची पुर्तता करणारे उमेदवार यांनी खाली दिलेल्या विहित दिनांकाच्या मुदतीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज भरावेत.
  • ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्याचा दिनांक : दि.०५.०३.२०२४ रोजी पासुन
  • ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : दि.१५.०४.२०२४ रोजी २४.०० वा. पर्यंत

परीक्षा शुल्क

  • खुला प्रवर्ग : रू 450/-
  • मागास प्रवर्ग: रू 350/-

नवीन उमेदवार नोंदणी, अर्ज करण्याचे चार सुलभ टप्पे

  • Step1 : नोंदणी
  • Step 2 : लॉग इन
  • Step 3 : अर्ज करा
  • Step 4 : शुल्क भरणा करा

पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे | Police Bharti Documents List

सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापुर्वी उमेदवारांनी प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.
  • SSC / HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र,
  • जन्म दाखला,
  • रहिवाशी प्रमाणपत्र,
  • जातीचे प्रमाणपत्र
  • जात वैधता प्रमाणपत्र,
  • संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MSCIT),
  • खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोचपावती (शासन निर्णय दि.१७/३/२०१७ व दि. ११/०३/२०१९ प्रमाणे),
  • नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्रः (वि.जा-अ, भ.ज-ब, भ.ज-क, भ.ज-ड, विमाप्र, इमाव, एसईबीसी, इडब्लूएस प्रवर्गातील पुरूष व महिलांकरीता आरक्षीत असलेल्या पदांवरील निवडीकरीता दावा करू इच्छित असणाऱ्या महिला यांचेबाबत महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय दि. ०४/०५/२०२३ मधील तरतूद क्र.४ नुसार),
  • माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र,
  • गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र, (जाहिरात दिनांकास १०९५ दिवस पूर्ण झालेल्या उमेदवारास आवेदन अर्ज सादर करता येईल),
  • प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र,
  • भुकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र,
  • पोलीस पाल्य प्रमाणपत्र,
  • अनाथाबावतचे प्रमाणपत्र,
  • अंशकालीन प्रमाणपत्र,
  • इ.डब्ल्यू.एस. प्रमाणपत्र,
  • NCC प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे.

उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड झाल्या नंतर तपासण्यात येतील.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लघुपटाचे LIVE प्रसारण

अर्जदाराने अर्जभरण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात

  1. अर्ज भरण्यापूर्वी अधिवास प्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र तसेच NCC प्रमाणपत्र इत्यादी अर्हतेनुसार तयार ठेवावे.
  2. अर्जदाराने त्याचा ई-मेल आयडी व मोबाइल नंबर काळजी पूर्वक निवडावा. भरती संदर्भात सर्व माहिती नोंदविलेल्या ई-मेल आयडी व मोबाइल नंबरवर पुरवण्यात येईल.
  3. अर्जदारास प्रत्येक अर्जासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य असेल.
  4. परीक्षेची निश्चित तारीख हि संकेत स्थळावर जाहीर करण्यात येईल.

पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज येथे करा | Police Bharti Apply online 2024

  • अर्ज ऑनलाईन भरण्याकरीता आवश्यक माहिती www.policerecruitment2024.mahait.org व www.mahapolice.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
  • ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा फक्त https://policerecruitment2024.mahait.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आरटीईच्या महाराष्ट्रातील जिल्हानिहाय शाळा आणि जागा येथे पहा

$ads={2}

पोलीस भरतीच्या 17 हजार 499 पदांची जाहिरात येथे पहा | पोलीस भरती ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

जिल्हा सत्र न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी! पात्रता फक्त 4 थी पास, 47,600 एवढा पगार मिळणार

महावितरण कंपनीमध्ये नवीन सरळसेवा भरती सुरु

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post