Police Recruitment 2024 : महत्वाची अपडेट! राज्यातील पोलीस भरती संदर्भात महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर, 17 हजार 499 जागांसाठी मोठी भरती सुरु

Police Recruitment 2024 : राज्यातील पोलीस भरती सुरु झाली असून, पोलीस शिपाई, पोलीस शिपाई (चालक), बॅण्डस्मन, पोलीस शिपाई (सशस्त्र), कारागृह शिपाई या पदांच्या तब्बल 17 हजार 499 जागांसाठी मोठी भरतीची जाहिरात निघाली असून, आता यांसदर्भात एक महत्वाची सूचना उमेदवारांना देण्यात आली आहे.

$ads={1}

मोठी अपडेट! राज्यातील पोलीस भरती संदर्भात महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर

Police Recruitment 2024

पोलीस भरती २०२३ मधील पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना कळविण्यांत आले आहे की, दिनांक ३१.०३.२०२४ पर्यंत आवेदन अर्ज सादर करण्याबाबत Mahait यांच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले असून, त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरु आहे. त्याप्रमाणे उमेदवारांना SEBC प्रमाणपत्र मिळणेस विलंब लागत आहे, म्हणून सर्व उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक १५.०४.२०२४ करण्यात आली आहे.

अंतिम दिनांकापुर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास, अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळणेसाठी केलेला अर्जाची पोचपावतीसह आवेदन अर्ज सादर करावा. मात्र कागदपत्र पडताळणीवेळी त्यांचेकडे विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

पोलीस भरती जाहिरात येथे डाउनलोड करा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

शिक्षक भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध

$ads={2}

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत नवीन भरती सुरु, सविस्तर तपशील पहा

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Police Recruitment 2024

Previous Post Next Post