सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट! परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन (DCPS) योजनेचा महत्वपूर्ण शासन निर्णय जारी

Defined Contribution Pension Scheme : सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन (DCPS) योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता कर्मचारी हिस्सा व शासन हिस्सा यावरील व्याज अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्यात आला आहे.

$ads={1}

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन (DCPS) योजनेचा महत्वपूर्ण शासन निर्णय जारी

dcps gr

जिल्हा परिषदा, मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील १००% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन (Defined Contribution Pension Scheme) योजना लागू करण्यात आलेली आहे.

दिनांक ४ ,मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये वित्त विभागाने सुधारित अंदाजाच्या मर्यादेत १०० टक्के तरतूद उपलब्ध करुन दिली आहे. त्या मर्यादेत सन २०२३-२४ मध्ये कर्मचारी हिस्सा व शासन हिस्सा यावरील व्याज अदा करण्यासाठी सदर लेखाशीर्षाखाली निधी वितरीत करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक २८ मार्च २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. 

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन (DCPS) योजनेतंर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षांसाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतूद बीम्स प्रणालीवर वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. (शासन निर्णय)

कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्तिवेतन योजना लागू

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. 

या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के इतके निवृत्तिवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ, तसेच निवृत्तिवेतनाच्या ६० टक्के इतके कुटूंब निवृत्तिवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे.

राज्यातील कर्मचारी संघटनेस शासन मान्यता देण्याबाबतचा महत्वपूर्ण शासन निर्णय!

मोठा निर्णय! 1 एप्रिलपासून रजेसाठी ऑफलाइन अर्ज चालणार नाही; शासन परिपत्रक
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा