Dearness Allowance : या सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात भरघोस वाढ; शासन निर्णय जारी

Dearness Allowance : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात (Dearness Allowance) भरघोस वाढ करण्यात आली असून, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मूळ वेतनाच्या ५० टक्के झाला आहे, आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये वाढ करण्याबाबतचे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे, सामान्य प्रशासन, विधी व न्याय विभागाने यासंदर्भात महत्वाचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे.

$ads={1}

या सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात भरघोस वाढ

Dearness Allowance

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या संचालक, केंद्रीय वित्त व व्यय विभाग, (केंद्र सरकार), नवी दिल्ली दि.१२.०३.२०२४ कार्यालयीन ज्ञापनानुसार, दि.०१.०१.२०२४ पासून लागू करण्यात आलेली ४% (४६% ते ५०%) महागाई भत्त्यातील (Dearness Allowance) वाढ व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागू करण्यात आली आहे.

त्यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दि.०१.०१.२०२४ पासून ५०% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय असणार आहे. सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने अदा करण्याबाबत दिनांक २६ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये कळविण्यात आले आहे. (शासन निर्णय)

मोठी बातमी! दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षण मंडळाचा महत्वपूर्ण निर्णय!

कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ‘दोन’ महत्वाचे शासन निर्णय

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा