SSC Exam 2024 : मोठी बातमी! दहावीच्या विद्यार्थ्यांना आता ‘त्या' प्रश्नांचे गुण मिळणार, शिक्षण मंडळाचा महत्वपूर्ण निर्णय!

SSC Exam 2024 : दिनांक 18 मार्च रोजी इयत्ता दहावीचा विज्ञान – 1 या विषयाचा बोर्डाचा पेपर झाला होता, यामध्ये प्रश्न 1 (B) मधील i क्रमांकाच्या 'सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा.' या प्रश्नाच्या उत्तराबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात संदिग्धता निर्माण झाली होती, आता यांसदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

$ads={1}

दहावीच्या विद्यार्थ्यांना आता 'त्या' प्रश्नांचे गुण मिळणार

SSC Exam 2024

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेच्या दि. १८ मार्च २०२४ रोजीच्या इ.१० वी विज्ञान भाग १ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न १ (बी) मधील i कमांकाच्या 'सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा' या प्रश्नाच्या उत्तराबाबत विद्यार्थी व पालक यांच्या मनात संदिग्धता निर्माण झाली होती.

पाठ्यपुस्तकानुसार सदर प्रश्नाचे अचूक उत्तर 'हेलियम' हे आहे. तर काही संदर्भपुस्तकांमध्ये याचे उत्तर 'हायड्रोजन' असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकामध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

त्याअनुषंगाने पुणे विभागीय मंडळाने संबंधित विषयाच्या विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेतले असून, त्यांनी दिलेल्या अहवालानुसार वरील दोन्ही भिन्न उत्तरांचा विचार करता व विद्यार्थी हिताच्या दृष्टीने उपरोक्त प्रश्नाचे उत्तर 'हेलियम' किंवा 'हायड्रोजन' लिहिले असल्यास ते ग्राहय धरून गुणदान करावे असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित विषयाचे सर्व नियामक व परीक्षक यांना उत्तरपत्रिका तपासणीसंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.

दहावी बारावी परीक्षेचा निकाल या तारखेला जाहीर होणार

वैज्ञानिकदृष्ट्या विचार करता त्या प्रश्नाचे अचूक उत्तर 'हायड्रोजन' हे आहे. मात्र काही शाळांमध्ये याचे उत्तर 'हेलियम' असल्याचे तर काही शाळांमध्ये योग्य उत्तर 'हायड्रोजन' असल्याचे सांगण्यात येत होते. यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती.

हायड्रोजनच्या अणुत्रिजेची गणना मूल्य 53 pm आहे तर हेलिअमच्या अणुत्रिजेचे गणना मूल्य 31 pm आहे; कारण जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा अणुत्रिज्या कमी होण्याची शक्यता असते. तथापि, हायड्रोजन हा द्वि-आण्वीय वायू आहे तर हेलिअम हा एक-अण्वीय वायू आहे. त्यामुळे, अणुत्रिज्यांच्या गणना केलेल्या मूल्यांची तुलना करणे योग्य नाही. दोन्ही अणूंची 'बॅन दे वॉल्झ' (Van der Waals) त्रिज्यांची तुलना करणे अधिक योग्य ठरेल. हायड्रोजन अणूची बॅन दे वॉल्झ त्रिज्या ही 120 pm आहे तर हेलिअम अणूची वॅन दे वॉल्झ त्रिज्या ही 140 pm आहे.

SSC Exam Marks 2024

या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भातील ही संदिग्धता लक्षात घेता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सदरचा निर्णय घेतला आहे.

'आरटीई' प्रवेशासाठी शाळांना या तारखेपर्यंत अंतिम मुदत

मोठी बातमी! नवीन शैक्षणिक वर्षांपासून आता सर्व शाळांमध्ये 'हा' उपक्रम

$ads={2}

मुलांच्या संगोपनासाठी दरमहा 2250 रूपये मिळणार; डाउनलोड ऑनलाइन फॉर्म..

Previous Post Next Post