Maharashtra Board HSC SSC Result 2024 : दहावी बारावी निकाल कधी जाहीर होणार? सर्वात आधी 'येथे' पहा तुमचा निकाल !

Maharashtra Board HSC SSC Result 2024 : दहावी बारावी बोर्ड परीक्षा नुकत्याच संपल्या असून, आता या वर्षीच्या परीक्षांचे निकाल कधी जाहीर होणार याबाबत विद्यार्थी पालकांमध्ये उत्सुकता लागली आहे, या परीक्षांचे निकाल कधी? आणि सर्वात आधी तुम्ही हा निकाल कोठे पाहू शकता, याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

$ads={1}

Maharashtra Board HSC SSC Result 2024

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२4 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १० वी, १२ वी) परीक्षा नुकतीच संपन्न झाली आहे.

मागील वर्षी बारावीचा निकाल मे महिन्याच्या (दि २५) तारखेला (दु २ वाजता) जाहीर करण्यात आला होता, तर दहावीचा निकाल (दि 2 जून) रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला होता. आता या वर्षीच्या परीक्षांचे निकाल कधी जाहीर होणार याबाबत विद्यार्थी पालकांमध्ये उत्सुकता लागली आहे. 

बारावी परीक्षेचे निकाल वेळेवर जाहीर होणार

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाच्या विविध मागण्यांसंदर्भात त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर फेब्रुवारी महिन्यात शालेय शिक्षण मंत्री यांच्या समवेत महत्वाची बैठक झाली, यावेळी आयटी आणि इतर शिक्षकांचे समायोजन, १२ आणि २४ वर्षानंतरची कालबद्ध पदोन्नती, २४ वर्षानंतर २० टक्क्याप्रमाणे दिल्या जाणाऱ्या पदोन्नतीऐवजी एकाच वेळेला सर्वांना पदोन्नती देणे, याचप्रमाणे काही दीर्घकालीन मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली, बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर शिक्षक संघाने इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला असल्याचे जाहीर केले होते, त्यामुळे आता बारावी परीक्षांचा निकाल वेळेत जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

निकाल कोठे व कसा पाहता येईल? 

  • Step 1: सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईट (HSC SSC Exam Result 2024 Official Website) ला भेट द्या - बोर्ड वेबसाईट - mahresult.nic.in
  • Step 2 : वेबसाईट ओपन झाल्यानंतर तिथे तुमचा HSC SSC Exam Roll No (Seat No) टाका त्यानंतर
  • Step 3 : तुम्हच्या आईचे नाव टाका जे कि, तुम्ही बोर्डाचा फॉर्म भरताना जी स्पेलिंग आईच्या नावाची टाकली असेल ते टाका , जर आईचे नाव टाकले नसल्यास  'XXX' असे टाका  (Enter 'XXX' if mother's name is not mentioned in the form)
hsc ssc board exam result 2024
  • Step 4 : आता View Result या बटनावर क्लिक करा तुमचा निकाल स्क्रीन वर दिसेल  (सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा..!! )
  • Step 5 :  तुमचा निकाल PDF मध्ये Save करा आणि प्रिंट करा.
  • दहावी बारावीचा निकाल SMS द्वारे मोबाईलवर असा चेक करा

    Maharashtra SSC/HSC Result On SMS : दहावीचा निकाल पाहण्यासाठी एकदम साईट वर लोड आल्यास मोबाईलवर SMS द्वारे पाहता येणार आहे. त्यासाठी खालील स्टेप फॉलो करा

    • मोबाईल मधील Messaging App ओपन करा
    • तिथे उजव्या बाजूच्या + या आयकॉन वर क्लिक करा
    • त्यांनतर कॅपिटलमध्ये MHSSC दहावीसाठी, MHHSC बारावीसाठी असे टाईप करा, आणि त्यापुढे तुमचा  रोल नंबर टाइप करा.
    • हा एसएमएस SMS 57766 या क्रमांकावर पाठवा.
    • क्षणात तुमच्या निकालाचा मेसेज तुम्हाला मिळेल.

    दहावी बारावी निकाल कधी जाहीर होणार?

    दहावी, बारावी महाराष्ट्र बोर्ड परीक्षा बाबत निकालाची तारीख अद्याप अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही, मात्र निकालाचे प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही (https://results.gov.in / https://mahresult.nic.in) या अधिकृत संकेतस्थळास वेळोवेळी भेट देऊ शकता.

    आरटीई 25 टक्के प्रवेश अर्ज कधी सुरु होणार

    मुलांच्या संगोपनासाठी दरमहा 2250 रूपये मिळणार; डाउनलोड ऑनलाइन फॉर्म..

    $ads={2}

    Previous Post Next Post