PCMC Counsellor Recruitment : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना विविध मुद्यांवर समुपदेशन करणेकामी 'समुपदेशक' (Counsellor) पदांसाठी जाहिरात देण्यात आली असून, सविस्तर तपशील पाहूया..
$ads={1}
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 'समुपदेशक' पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध
पदांचा तपशील
- एकूण पदे : २५
- पदाचे नाव : समुपदेशक (Counsellor)
- दरमहा एकत्रित मानधन - 30,000/-
आवश्यक शैक्षणिक अर्हता
- UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून क्लिनिकल / समुपदेशन मानसशास्त्रात नियमित पदव्युत्तर पदवी. किंवा
- UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून वैद्यकीय आणि मानसोपचार / कौटुंबिक आणि बालकल्याण या विषयातील स्पेशलायझेशनसह नियमित MSW (मास्टर इन सोशल वर्क). किंवा
- UGC मान्यताप्राप्त महाविद्यालयातून मानसशास्त्र (6 युनिट), सामाजिक कार्य (6 युनिट) मध्ये नियमित पदवी आणि मान्यताप्राप्त महाविद्यालयातून मार्गदर्शन आणि समुपदेशनाचा डिप्लोमा.
- संगणक कौशल्ये तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक
वयोमर्यादा : वय वर्ष 35 पर्यंत
'समुपदेशक' पदांसाठी अर्ज येथे करा
उमेदवाराने सोबत दिलेल्या नमुन्यात समुपदेशक या पदासाठी अर्ज मा.अति.आयुक्त (१), पिंपरी चिंचवड महानगरपालिका. पिंपरी १८. यांच्या नावाने करावा. सदरचा अर्ज दि. ०२/०४/२०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत समक्ष जुना ड प्रभाग कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील, मनपा प्राथमिक शाळा, पिंपरीगाव. येथे वेळेत सादर करावा. पोस्टाद्वारे/कुरीयरद्वारे अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
आवश्यक कागदपत्रे
उमेदवाराने आपल्या अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, धारण केलेली शैक्षणिक अर्हता, पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक, अनुभव प्रमाणपत्र, आधारकार्ड, आरक्षण प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक प्रमाणपत्र व कागदपत्राच्या सत्य प्रती सादर करणे बंधनकारक आहे.
दहावी बारावी निकालाची तारीख जाहीर, या दिवशी लागणार निकालसदरची जाहिरात व अर्जाचा नमुना महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावर (Online) पाहता येईल. जाहिरातीनुसार कार्यवाही करणे अथवा प्रक्रिया कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचा अंतिम निर्णय मा.अति. आयुक्त (१) सो.पिं.चिं. मनपा यांचा राहील.
आरटीई 25 टक्के प्रवेश अर्ज कधी सुरु होणार
$ads={2}
कर्मचाऱ्यांसाठी (DCPS) योजनेचा महत्वपूर्ण शासन निर्णय जारी
राज्यातील कर्मचारी संघटनेस शासन मान्यता देण्याबाबतचा महत्वपूर्ण शासन निर्णय!
या विभागात 468 जागांसाठी नवीन मोठी भरती सुरु