DA Hike GR : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात (Dearness Allowance) भरघोस वाढ करण्यात आली असून, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मूळ वेतनाच्या ५० टक्के झाला आहे, आता राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ करण्यासंदर्भात दोन महत्वाचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे.
$ads={1}
राज्यातील 'या' सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्यात 4 टक्क्यांची भरघोस वाढ
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक १ जानेवारी २०२४ पासून लागू करण्यात आलेला ४ टक्के वाढीव दराने महागाई भत्ता (Dearness Allowance) व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू करण्यात आले आहे. त्यानुसार दि. १ जानेवारी २०२४ पासून ५०% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय असणार आहे. याबाबतचा शासन निर्णय दिनांक १३ मार्च २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक, लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय, निवृत्तीवेतन व निवृत्ती वेतन धारकांचे कल्याण विभाग, नवी दिल्ली यांच्या दिनांक १३ मार्च २०२४ च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्यातील (Dearness Relief) ४% दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार आता महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृत्ती वेतनधारकांना/ कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना दि.१ जानेवारी २०२४ पासून ५०% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय असणार आहे, याबाबतचा शासन निर्णय दिनांक १९ मार्च २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात भरघोस वाढ; शासन निर्णय जारीआरटीई 25 टक्के लेटेस्ट अपडेट पहा
कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता अपघात विमा योजना लागू, परिपत्रक पहा