Contract Workers Decision : कंत्राटी सफ़ाई कामगारांना अखेर तब्बल ११ वर्षानंतर त्यांची प्रलंबित मागणी मान्य करण्यात आली असून, याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक २७ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे.
$ads={1}
राज्यातील या कंत्राटी कामगारांची तब्बल 11 वर्षानंतर मागणी मान्य; शासन निर्णय जारी
कंत्राटी सफ़ाई कामगारांच्या ज्यादा कामाचे वेतन अदा करण्याबाबत, सहाय्यक आयुक्त तथा प्राधिकारी पुणे यांनी एकूण ६४ सफ़ाई कामगारांना रु.१८,३२,६००/- (अक्षरी रुपये अठरा लक्ष बत्तीस हजार सहाशे फ़क्त) इतकी रक्कम अदा करण्याचा दि.०३.१२.२०१४ रोजी अभिनिर्णय दिला होता.
त्यानुषंगाने आता कंत्राटी सफाई कामगारांनी ०१ जुलै, २०१३ ते ३१ डिसेंबर, २०१३ या कालावधीत केलेल्या ज्यादा कामाकरीता वेतन अदा करण्यास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
या कालावधीत केलेल्या ज्यादा कामाकरीता वेतन देण्यासाठी रु.१८,३२,६००/- (अक्षरी रुपये अठरा लक्ष बत्तीस हजार सहाशे फ़क्त) इतकी रक्कम अदा करण्यास मंजूरी देण्यात आलीआहे.
प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा, पुणे येथे मे. यशोदिप स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था लातूर यांना सन २००८ ते एप्रिल २०१४ या कालावधीकरीता कंत्राटी स्वच्छता सेवेचे कंत्राट देण्यात आले होते.
कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागविली माहिती; मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
सदरच्या कालावधीत नेमेलेल्या सफ़ाई कामगारांचे ०१ जुलै २०१३ ते ३१ डिसेंबर, २०१३ या कालावधीत केलेल्या ज्यादा कामाचा मोबदला न मिळाल्याने कंत्राटी कामगार संघटनेमार्फत सहाय्यक आयुक्त तथा प्राधिकारी पुणे यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला होता. (शासन निर्णय)