RTE Admission Start Date : राज्यातील आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, राज्यातील 72 हजार 284 शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे, खाजगी शाळांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांच्या 25% प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा सर्व पालकांना असून, आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज कधी सुरु होणार? असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे.
$ads={1}
आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज कधी सुरु होणार?
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. अधिसूचना दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ नुसार सुधारित नियम नमूद केलेले आहेत.
त्यानुसार यंदा खाजगी विना अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात, जर शासकीय किंवा अनुदानित शाळा असल्यास त्या शाळेत आता RTE 25% प्रवेश मिळणार नाही.
या बदलल्या नियमामुळे यंदा राज्यातील सर्व शाळांची नोंदणी नव्याने करण्यात येत आहे, त्यामुळे राज्यस्तरावरून सर्व शाळांची नोंदणी करण्यासाठी दिनांक २५ मार्च २०२४ पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे.
आतापर्यंत राज्यातील जवळपास 72 हजार 284 शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून, या शाळेत 9 लाख 25 हजार 306 प्रवेश क्षमता असल्याचे सध्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे. मात्र शाळांची 100 टक्के नोंदणी संपल्यानंतर दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या नवीन अधिसूचनेत केलेल्या नियमानुसार, या शाळांचे मॅपिंग करण्यात येईल आणि त्यानंतर राज्यातील शाळांची जिल्हानिहाय संख्या आणि आरटीई 25 टक्के (RTE Vacancy) रिक्त जागा निश्चित करण्यात येईल, त्यानंतर प्रत्यक्ष पालकांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे टप्पे
RTE Admission 2024-25 प्रक्रिया साधारणपणे वेगवेगळ्या टप्यामध्ये पार पडत असते, त्यामध्ये पहिल्या टप्यात वरील व्यवस्थापनाच्या पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन सुरु करण्यात आले आहे. RTE प्रवेश प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे
- आरटीई प्रवेशासाठी शाळांची नोंदणी
- विद्यार्थी नोंदणी | RTE New Registration
- ऑनलाईन अर्ज | RTE Online Application
- विद्यार्थी माहिती भरणे | Child Information
- ऑनलाईन अर्ज भरणे |RTE Online Application
- आरटीई शाळा निवड | School Selection
- भरलेल्या अर्जाची स्थिती | Summary - Application Details
- लॉटरी पद्धतीने निवड
- प्रवेशपत्र |Admit Card
- कागदपत्रे तपासणी
- RTE प्रवेश निश्चित
पहिल्या टप्यातील शाळांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच सध्या दिलेल्या नियोजित तारखेनुसार दिनांक 12 April पर्यंत शाळांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील टप्पा म्हणजे प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणी म्हणजेच पालकांना RTE साठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
आरटीई २५ टक्के प्रवेश या तारखेनंतर ऑनलाईन अर्ज भरता येणार
मोठी अपडेट! आरटीई ऑनलाईन अर्ज करण्याकरिता अत्यंत महत्वाच्या सूचना
$ads={2}
आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी लागणारे 'ही' आवश्यक कागदपत्रे