मोठी अपडेट! आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ, ऑनलाईन अर्ज या तारखेनंतर सुरु होणार

RTE Admission 2024-25 Maharashtra Start Date : राज्यातील आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, राज्यातील 75 हजार 960 शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे, खाजगी शाळांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांच्या 25% प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा सर्व पालकांना असून, आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज कधी सुरु होणार? असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे, याबाबतची सविस्तर माहिती पाहूया..

$ads={1}

मोठी अपडेट! आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

RTE Admission 2024-25 Maharashtra Start Date

शिक्षण हक्क कायद्यानुसार (Right to education) सन २०२४ २५ या शैक्षणिक वर्षातील आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून, आता  (RTE Admission Online Application) करण्याकरिता अत्यंत महत्वाच्या सूचना शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आल्या आहेत.

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय ६+ गृहित धरताना मानीव दिनांक ३१ डिसेंबर निश्चित करणेत आलेला आहे.

आरटीई २५ टक्के प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे

  1. आधारकार्ड
  2. जन्मदाखला
  3. जात प्रमाणपत्र
  4. उत्पन्नाचा दाखला (उत्पन्नाचा दाखला रु. १ लाखापेक्षा कमी उत्पन्न.) प्रवेश प्रक्रीया सुरु होणाऱ्या एक वर्षापूर्वीच्या आर्थिक वर्षातील असावा, उदा. सन २०२४-२५ मध्ये प्रवेश घेताना पालकांचे सन २०२२-२३ किंवा २०२३-२४ या वर्षातील उत्पन्नाचा दाखला प्रवेशाकरीता ग्राहय समजण्यात येणार आहे.
  5. दिव्यांग मुलांसाठी ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र
  6. भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरीता : भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृतच असावा.  भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी ११ महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा.

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी शाळांचा प्राधान्यक्रम निश्चित

वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई २५ टक्के प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा व स्वंयअर्थसहाय्यीत शाळा असा प्रवेशासाठीचा प्राधान्यक्रम असणार आहे.

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी 'या' विद्यार्थ्यांना खासगी (इंग्रजी) शाळेचा पर्याय मिळणार

ज्या विदयार्थ्यांच्या घरापासून १ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा नसतील व १ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर स्वंयअर्थसहाय्यीत शाळा (Self-financed School) असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वंयअर्थसहाय्यीत (इंग्रजी) शाळेत मुलांना २५ टक्के प्रवेशांतर्गत प्रवेश दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी 'या' विद्यार्थ्यांना ३ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शाळांचा पर्याय मिळणार

अपवादात्मक परिस्थितीत विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून १ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा व स्वंयअर्थसहाय्यीत शाळा नसेल तर विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून ३ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शाळांमध्ये वर नमूद केलेल्या प्राधान्य क्रमानुसार प्रवेश मिळणार आहे.

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे टप्पे

RTE Admission 2024-25 प्रक्रिया साधारणपणे वेगवेगळ्या टप्यामध्ये पार पडत असते, त्यामध्ये पहिल्या टप्यात वरील व्यवस्थापनाच्या पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन सुरु करण्यात आले आहे. RTE प्रवेश प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे
  1. आरटीई प्रवेशासाठी शाळांची नोंदणी
  2. विद्यार्थी नोंदणी | RTE New Registration
  3. ऑनलाईन अर्ज | RTE Online Application
  4. विद्यार्थी माहिती भरणे | Child Information
  5. ऑनलाईन अर्ज भरणे  |RTE Online Application
  6. आरटीई शाळा निवड | School Selection
  7. भरलेल्या अर्जाची स्थिती | Summary - Application Details
  8. लॉटरी पद्धतीने निवड
  9. प्रवेशपत्र |Admit Card
  10. कागदपत्रे तपासणी
  11. RTE प्रवेश निश्चित

राज्यातील 75 हजार 960 शाळांची नोंदणी पूर्ण

राज्यातील आरटीई 25 टक्के शाळा नोंदणी दिनांक 12 एप्रिल 2024 पर्यंत सुरु असणार आहे. राज्यभरातील जवळपास 75 हजार 960 शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून, सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील 5 हजार 151 शाळा नोंदणी झाली आहे, त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील 4 हजार 54 शाळा तर नाशिक जिल्ह्यातील 4 हजार 14 शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे.

आरटीई 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज या तारखेनंतर सुरु होणार

RTE Admission 2024-25 Maharashtra Start Date :पहिल्या टप्यातील शाळांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच सध्या RTE पोर्टलरील नियोजित तारखेनुसार दिनांक १२ एप्रिल २०२४ पर्यंत शाळांची नोंदणी सुरु असणार आहे. त्यानंतर पुढील टप्पा म्हणजे प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणी म्हणजेच पालकांना RTE साठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

मोठी बातमी! अखेर आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरु

पहिलीत प्रवेश घेण्याची वयोमर्यादा बदलली; नवीन प्रवेशित बालकांची वयोमर्यादा येथे पहा

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसंदर्भात इतर महत्वाच्या सूचना येथे पहा

$ads={2}

आरटीई प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन अर्ज - पालकांकरीता महत्वपूर्ण सूचना जारी

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे टप्पे येथे पहा

आरटीईच्या महाराष्ट्रातील जिल्हानिहाय शाळा आणि जागा येथे पहा

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा