महत्वाची अपडेट! राज्यातील या योजनेतील कर्मचारी, अधिकारी यांच्या अस्थायी पदांना मुदतवाढ, शासन निर्णय जारी

Temporary Posts Extension : राज्यातील वन विभागामध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत वनीकरणासाठी कार्यरत असणाऱ्या कर्मचारी, अधिकारी यांच्या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबतचा महत्वपूर्ण शासन निर्णय दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

$ads={1}

महत्वाची अपडेट! राज्यातील या योजनेतील कर्मचारी, अधिकारी यांच्या अस्थायी पदांना मुदतवाढ, शासन निर्णय जारी

Temporary Posts Extension

वन विभागामध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामीणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी, वन विभागातील कामे (उदा. वनीकरण, जलसंधारण व वनतळ्यांची कामे घेण्यात येतात. ही कामे करुन घेण्यासाठी सोबत दर्शविलेल्या विवरणपत्रातील कर्मचारी वन विभागांतर्गत कार्यरत आहेत. 

उप वनसंरक्षक, (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), नागपूर यांनी दि.२६.०२.२०२४ रोजीच्या पत्रान्वये सदर प्रस्ताव सादर केला होता.

Temporary Posts Extension

त्यानुसार प्रस्तावास अनुसरुन सोबतच्या विवरणपत्रात दर्शविलेली ९३८ पदे वन विभागाच्या मंजूर आकृतीबंधामध्ये समाविष्ट असल्याने, सदर ९३८ अस्थायी पदांना वित्त विभागाचा दि २१ फेब्रुवारी २०२४ येथील शासन निर्णय तसेच उप वनसंरक्षक, (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), नागपूर यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांच्या अधिन राहून आता  दि.०१.०३.२०२४ ते दि.३१.०८.२०२४ पर्यंत चालू ठेवण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. (शासन निर्णय)

कर्मचाऱ्यांना या कार्यालयांनी सुट्टी न दिल्यास होणार कारवाई

Previous Post Next Post