Teacher Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या अस्थायी आस्थापनेवर गट 'क' संवर्गातील "सहाय्यक शिक्षक" व "पदवीधर शिक्षक" पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविणेत आले आहेत, यामध्ये मराठी, उर्दू आणि हिंदी माध्यमाच्या एकूण 327 जागा भरण्यात येत आहे.
$ads={1}
शिक्षक भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध
पदाचे नाव
- सहाय्यक शिक्षक (मराठी, उर्दू, हिंदी)
- पदवीधर शिक्षक (मराठी, उर्दू, हिंदी)
एकूण पदे - 327
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्ष-२०२४-२५ केवळ या कालावधीसाठीच मराठी, ऊर्दू, हिंदी माध्यमाच्या शाळांमध्ये पात्र उपशिक्षक/पदवीधर यांची एकत्रित मानधन तत्वावर 11 महिने कालावधीसाठी (उन्हाळी सुटटी व दिपावली सुट्टी वगळून) तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करणेसाठी दिनांक ०१/०४/२०२४ ते १६/०४/२०२४ अखेर सकाळी १०.०० ते सांय ५.०० वा.पर्यंत समक्ष अर्ज मागविणेत आले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय!उमेदवाराने सोबत दिलेल्या नमुन्यात सहा. शिक्षक व पदवीधर शिक्षक या पदासाठी अर्ज मा. अति. आयुक्त (१), पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या नावाने करावा. सदरचा अर्ज ०१/०४/२०२४ ते १६/०४/२०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ०५.०० वाजेपर्यत समक्ष जुना 'ड' प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा.पाटील मनपा प्राथ.शाळा, पिंपरीगाव, येथे वेळेत सादर करावा.
वरील पदाकरिता भरावयाच्या पदांची आरक्षण निहाय संख्या (सामाजिक व समांतर आरक्षण) शैक्षणिक अर्हता, मानधन वेतन, अर्जाचा नमुना अर्ज करावयाची मुदत, इतर आवश्यक अटी व शर्ती, सर्वसाधारण सूचना महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मूळ जाहिरात व नमुना अर्ज येथे डाउनलोड करा
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध
पोलीस भरती जाहिरात येथे डाउनलोड करा
दहावी बारावी निकालाची तारीख जाहीर, या दिवशी लागणार निकाल$ads={2}
आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज
सुवर्णसंधी! या विभागात 468 जागांसाठी नवीन मोठी भरती