MPSC PSI Result 2024 : मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दोन महत्वाचे अपडेट जाहीर

MPSC PSI Result 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील पदांसाठी दोन महत्वाचे अपडेट देण्यात आले आहे, ‘पोलीस उपनिरीक्षक’ संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, शारीरिक चाचणीचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे, सविस्तर वाचा..

$ads={1}

पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

MPSC PSI Result 2024

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा- २०२१ या परीक्षेतील पोलीस उप निरीक्षक संवर्गाच्या  एकूण ३७८ पदांसाठी (PSI Result 2024) सर्वसाधारण गुणवत्ता यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केली आहे. ही यादी आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.

ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणीअंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये, शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो, असे आयोगाने कळविले आहे.

पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेचा शारीरिक चाचणी कार्यक्रम पुढे ढकलला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षा - २०२२ मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम १५ एप्रिल ते २ मे, २०२४ या कालावधीत आयोजित केला होता. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरिता मनुष्यबळ आवश्यक आहे. या कारणांमुळे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होवू न शकल्याने शारीरिक चाचणीचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा - २०२२ च्या शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाकरिता पोलीस अधिकारी तसेच इतर मनुष्यबळ पुरविणे शक्य होणार नसल्याचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी कळविले असल्याने शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे.

सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करणार

राज्यात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरिता मनुष्यबळ आवश्यक असल्याने शारीरिक चाचणीच्या कार्यक्रमाकरिता पोलीस अधिकारी तसेच इतर मनुष्यबळ पुरविणे शक्य होणार नसल्याचे शारीरिक चाचणीचा दिनांक १५ एप्रिल ते २ मे, २०२४ या कालावधीतील नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असून, शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे आयोगाने कळविले आहे.

आरटीई 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख पहा

महावितरण कंपनीमध्ये नवीन सरळसेवा भरती सुरु

अधिकृत वेबसाईट - https://mpsc.gov.in/

$ads={2}

राज्यात तब्बल 17 हजार 499 पदांची पोलीस भरती सुरु

सुवर्णसंधी! या विभागात 468 जागांसाठी नवीन मोठी भरती

आरटीईच्या महाराष्ट्रातील जिल्हानिहाय शाळा आणि जागा येथे पहा

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा