SCERT SWADHYAY पुन्हा सुरू विद्यार्थ्यांनी आवर्जून घ्यावा या संधीचा लाभ

 स्वाध्याय हा उपक्रम कोव्हीड 19 च्या काळात गेल्या वर्षी सुरू झालेला आहे. कोरोनाच्या काळात शाळा बंद आहेत, परंतु शिक्षण सुरू राहण्यासाठी ऑनलाईन / ऑफलाईन शिक्षकांमार्फत सातत्याने प्रयत्न सुरू आहे. SCERT आयोजित SWADHYAY (student whatsapp based digital home assessment yojana) हा उपक्रमातील पुढील टप्पा म्हणजे 15 मे ते 5 जून 2021 या 4 आठवड्याठी पुन्हा स्वाध्याय सुरू झालेला आहे. 

Scert swadhyay


SCERT SWADHYAY पुन्हा सुरू विद्यार्थ्यांनी आवर्जून घ्यावा या संधीचा लाभ


इयत्ता 1 ली ते 9 वी च्या विद्यार्थ्यांनी या संधीचा जरूर लाभ घ्यावा. यामध्ये पायाभूत क्षमता व त्या त्या इयत्तेचे महत्त्वाचे Learning Outcomes यावर आधारित प्रश्न असणार आहे.

National FLN मिशन आणि शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये विद्यार्थ्यांचे अध्ययन किती प्रमाणात झाले आहे. या अनुषंगाने चाचपणी करता येणार आहे.

स्वाध्याय उपक्रमात सहभाग कसा घ्यायचा ? रजिस्ट्रेशन कसे करायचे याबाबत आपण यापूर्वी च्या ब्लॉग मध्ये माहिती घेतली आहे. अवश्य वाचा..

SCERT स्वाध्याय 15 मे ते 5 जून या कालावधीत रजिस्ट्रेशन कोणी करायचे?
शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये विद्यार्थी ज्या इयत्तेत होते त्याच इयत्तेचे स्वाध्याय त्यांनी सोडवायचे आहेत. म्हणजेच ज्यांनी स्वाध्याय उपक्रमाला यापूर्वी रजिस्ट्रेशन केले आहे. 

स्वाध्याय उपक्रमात सहभागी आहेत, त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. ज्यांनी आत्तापर्यंत सहभाग घेतला नाही त्यांना रजिस्ट्रेशन करावे लागेल. {alertSuccess}


रजिस्ट्रेशन करण्यासाठी आता UDISE अनिवार्य करण्यात आला आहे. ज्यांना नविन रजिस्ट्रेशन करायचे असतील अशा विद्यार्थ्यांनी आपल्या वर्ग शिक्षकांकडून युडायस क्रमांक घ्यावा.

15 मे 2021 च्या स्वाध्याय उपक्रम स्वरूप
इयत्ता 1 ली ते 9 वी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध
माध्यम- मराठी , सेमी-इंग्रजी , उर्दू
विषय- गणित 
> 1 ली ते 5 वी प्रत्येक विषयाचे 15 प्रश्न 
> 6 वी ते 9 वी प्रत्येक विषयाचे 20 प्रश्न असतील.

अशा प्रकारे SCERT स्वाध्याय उपक्रमामध्ये इयत्ता 1 ली ते 9 वीच्या विद्यार्थ्यांनी अवश्य सहभाग घेऊन या संधीचा अवश्य लाभ घ्यावा.

अशाच पद्धतीने नवनवीन अपडेट साठी EduNews या शैक्षणिक वेबसाईटवरील ताज्या घडामोडी सोबत अपडेट राहण्यासाठी whatsapp Group join करा.
Previous Post Next Post