NTS Exam म्हणजेच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 2020-21 NCERT राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , नवी दिल्ली यांच्या मार्फत घेण्यात येते.
परंतु सद्यस्थितीमध्ये देशात व राज्यात कोव्हीड 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दि. 13 जून 2021 रोजी होणारी NTS Exam पुढे ढकलण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि. 13 डिसेंबर 2020 रोजी इयत्ता 10 वी तील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या , राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध (NTS) परीक्षेतून राष्ट्रीयस्तर परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा NCERT नवी दिल्ली यांच्या मार्फत दि. 13 जून 2021 रोजी नियोजित होती. मात्र सदरची परीक्षा पुढे ढकण्याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (mscepune) यांच्या मार्फत कळविण्यात आले आहे.
NTS Exam पुढे ढकलण्याबाबतचे परिपत्रक डाऊनलोड करा.
NTS Exam राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा 2020-21 परीक्षेची तारीख यथावकाश NCERT नवी दिल्ली यांच्या संकेतस्थळावरून कळविण्यात येणार आहे. {alertSuccess}
शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी EDU News या वेबसाईटला अवश्य follow करा.
EDU News आता Whatsapp वर अपडेट मिळवण्यासाठी Edu News गृप जॉईन करा.