आय टी आय प्रवेश प्रक्रिया २०२१ | ITI admission 2021

महाराष्ट्र शासन , कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, संबंधित विभागामार्फत शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट २०२१ सत्रासाठी प्रवेश सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. 

राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट २०२१ सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया (Centralized Online Admission Process) पध्दतीने करण्यात येत असून प्रवेशाची सविस्तर “माहितीपुस्तिका - प्रवेश पध्दती, नियमावली व प्रमाणित कार्यपध्दती”  दि. १५ जुलै, २०२१ पासून प्रवेश https://admission.dvet.gov.in/ संकेत स्थळावर Download Section मध्ये Pdf स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

ITI Admission Portal : http://admission.dvet.gov.in

{getButton} $text={ITI Website} $icon={link} $color={Hex Color}

“ITI Admission माहितीपुस्तिका Download करा.

{getButton} $text={ITI माहिती पुस्तिका} $icon={download} $color={Hex Color}

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रीयेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी ITI औ.प्र. संस्थांमध्ये दि.१५ जुलै, २०२१ ते २१ ऑगस्ट, २०२१ दरम्यान रोज सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत नि:शुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे. सदर सुविधेचा सर्व उमेदवारांना या कालावधीत लाभ घेता येणार आहे.

ऑन लाईन प्रवेश अर्ज मुदत

प्रवेश प्रक्रीया दिनांक 15 जुलै, 2021 दु.02.00 वाजेपासून सुरु झालेली आहे व अंतिम दिनांक  ते  31 ऑगस्ट, 2021 सायं.5.00 वाजेपर्यंत आहे.

>> अधिक माहितीसाठी Admission Notification माहिती पुस्तिका डाउनलोड करण्यासठी येथे क्लिक करा.

{getButton} $text={Admission Notification} $icon={download} $color={Hex Color}

अत्यंत महत्वाचे 

>>  प्रवेश वेळापत्रक सूचक दर्शक असून त्यात बदल होऊ शकतो. अद्ययावत प्रवेश वेळापत्रक प्रवेश संकेतस्थळावर व सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 

>> तसेच नोंदणीकृत उमेदवारांना SMS व्दारे वेळोवेळी कळविण्यात येईल. संपूर्ण प्रवेश प्रक्रिये दरम्यान उमेदवारांनी वेळोवेळी प्रवेश संकेतस्थळास भेट देणे त्यांचे हिताचे राहील.

>> वेळोवेळी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (Directorate of Vocational Education and Training, Maharashtra State) यांच्या Official Website ला भेट द्या. https://admission.dvet.gov.in/

{getButton} $text={ITI Website} $icon={link} $color={Hex Color}


Post a Comment (0)
Previous Post Next Post