इंजिनिअर होण्यासाठी इंग्रजी भाषा सक्तीची नाही | मराठी भाषेतून मिळणार अभियांत्रिकीचे शिक्षण

मुलांच्या करियर विषयक महत्वाचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांनी घेतला आहे. डॉक्टर , इंजिनिअर होणं हे प्रत्येकाला वाटत असते. खूप साऱ्या मुलांच्या मध्ये हे शिक्षण घेण्याची क्षमता देखील असते. मात्र इंग्रजी म्हंटले की, मुले माघार घेतात. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील मुलांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.   शिक्षण क्षेत्रातील महत्वपूर्ण निर्णय म्हणजे 'नविन शैक्षणिक धोरण 2020' (NEP 2020) मध्ये मातृभाषेतून शिक्षणाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील मराठी विद्यार्थ्यांना आता मराठी भाषेतून इंजिनिअर म्हणजे अभियांत्रिकी चे शिक्षण घेता येणार आहे. 

engineering syllabus marathi mediumअखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने पहिल्या टप्प्यामध्ये 8 प्रादेशिक भाषांमधून इंजिनिअर (अभियांत्रिकी) चा अभ्यासक्रम सुरू करण्यास मागील वर्षात परवानगी दिली आहे. त्यामध्ये मराठी भाषा समाविष्ट आहे. त्यासोबत च हिंदी, तामिळ, तेलगू , गुजराती, कन्नड , मल्याळम आदी भाषांचा समावेश करण्यात आला आहे.

ज्या मुलांना इंग्रजी ची भीती वाटत होती किंवा इंग्रजी चा पाया कच्चा राहिल्यामुळे इंग्रजी तुन शिक्षण घेणे कठीण जात होते. त्यामुळे मुले इच्छा असूनही आवडत्या क्षेत्रापासून दूर राहत होती. मात्र आता यापुढे ज्यांना इंजिनिअर व्हायचे आहे. अशा विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे.

यापूर्वीच मुंबई व पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयानी मराठी भाषेतून अभ्यासक्रम सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि मुंबई विद्यापीठ यांचा मध्ये समावेश आहे.

शैक्षणिक अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post