LIVE "शाळा पूर्वतयारी अभियान" उद्घाटन समारंभ

राज्यात सन २०२०-२१ पासून 'स्टार्स' प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू  असून त्या अंतर्गत 'शाळापूर्व तयारी अभियान' उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियान / उपक्रम अंमलबजावणी करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत राज्यस्तर संसाधन गटाचे प्रशिक्षण दि. २ ते ५ मार्च २०२२ व विभागस्तरीय प्रशिक्षणे दि. ९ व १० मार्च २०२२ रोजी पूर्ण झालेली आहेत.

"शाळा पूर्वतयारी अभियान"


जून २०२२ मध्ये इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांची शिक्षक, अंगणवाडी सेविका, पालक तसेच स्वयंसेवक यांचे मदतीने शाळापूर्व तयारी करून घेण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आज दिनांक - १८ एप्रिल २०२२ रोजी वेळ - दुपारी ४:१५ वाजता  मा. ना. वर्षाताई गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार आहे. "शाळा पूर्वतयारी अभियान"  शाळेतील पहिले पाऊल कार्यक्रमाचे LIVE प्रेक्षपण SCERT पुणे युट्युब द्वारे करण्यात येत आहे.

कार्यक्रमाचे स्थळ - जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सातारा, ता. जि. औरंगाबाद



LIVE प्रेक्षपण लिंक -  https://youtu.be/STueirfA4Yc



हे सुद्धा वाचा

Previous Post Next Post