सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी, आरोग्य खात्यात तब्बल 10,949 पदांची मेगाभरती जाहिरात दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध होणार असल्याची महत्वाची घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री यांनी नुकतीच केली आहे. सविस्तर वाचा..
आरोग्य विभागात 10 हजार 949 पदांची मेगा भरती जाहीर
आरोग्य विभागाच्या या मेगाभरती अंतर्गत ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध 60 प्रकारची एकूण 10949 पदे भरली जाणार आहेत व याची जाहिरात 29 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
सन 2021 साली आरोग्य विभागात राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेवेळी पेपरफुटीचा घोटाळा झाला होता. त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबली होती.
आरोग्य विभागाच्या मेगा भरती मध्ये 'गट क' संवर्गात परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्यसेवक, आस्थापनेवरील पदे यामध्ये लिपिक, टंकलेखक, वाहनचालक यासारख्या पदांचा समावेश आहे. तर 'गट ड संवर्गात शिपाई, सफाई कामगार, कक्षसेवक यासारख्या पदांचा समावेश असणार आहे.
ही संपूर्ण भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत राबवली जाणार आहे, असेही सावंत यांनी सांगितले.
यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रभावी आरोग्यसेवा देण्यासाठी आवश्यक ते कुशल मनुष्यबळ उपलब्ध असणे गरजेचे असून याच धोरणातून ही मेगाभरती केली जाईल. ही संपूर्ण मेगाभरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे असा विश्वास समस्त उमेदवारांना देतो. या परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना माझ्या शुभेच्छा...! असे राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी ट्विट करून म्हंटले आहे. (जाहिरात)