National Sports Day :केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय यांच्या वतीने दरवर्षी दि. २९ ऑगस्ट हा दिवस मेजर ध्यानचंद यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन (National Sports Day) म्हणून साजरा केला जातो. सन २०२३ मध्ये दि. २१ ऑगस्ट ते दि २९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत कोणताही १ दिवस सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करावयाच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.
'राष्ट्रीय क्रीडा दिन' या वर्षातील थीम काय आहे?
महाराष्ट्र हे क्रीडा धोरण बनविणारे पहिले राज्य आहे. आजही देशपातळीवर क्रीडा क्षेत्रात राज्याचा दबदबा आहे. महाराष्ट्राने राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली असली तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम सामुहिक कामगिरीसाठी अधिक तयारी करण्याची गरज आहे. विशेषत: स्थानिक खेळांकडेही लक्ष द्यावे लागेल, असे सांगतानाच राज्यात फुटबॉलच्या विकासासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला. शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे पुणे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष : हॉकीचे जनक जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिनांक २९ ऑगस्ट १९०५ मध्ये झाला.
राष्ट्रीय क्रीडा दिन थीम 2023 : यावर्षीची संकल्पना ही खेळ हा सर्वसमावेशक आणि तंदुरुस्त समाजासाठी एक सहाय्यक ठरावा अशी आहे.
National Sports Day Theme 2023 : Sports As An Enabler For An Inclusive And Fit Society
राष्ट्रीय क्रीडा दिन उपक्रम | National Sports Day Activities |
राज्यातील सर्व शाळांनी दि.२१ ऑगस्ट ते दि २९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत कोणताही १ दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याबाबत कळविण्यात आले आहे. या कालावधीपैकी कोणताही १ दिवस व्यायामाचे खेळ, समकालीन खेळ किंवा स्वदेशी खेळ याबाबतचे उपक्रम आयोजित करावेत.
- वैयक्तिक उपक्रम न घेता समूहातील उपक्रम आयोजित करावेत, जेणे करून विद्यार्थ्यांमध्ये एकता सर्वसमावेशकता ही मूल्ये वाढीस लागतील.
- विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी करून क्रीडास्पर्धा किंवा तत्सम उपक्रम आयोजित करावेत.
- लिंगसमभाव अनुसरून विद्यार्थ्यांना २, ४ किंवा ६ गटांमध्ये विभाजित करावे.
- गटांची नावे ही स्वातंत्र्यवीर किंवा प्रसिद्ध खेळाडू यांच्या नावाने द्यावीत.
- विद्यार्थ्यांना स्थानिक उत्तम खेळाडूंचा परिचय करून द्यावा.
- शिक्षक व विद्यार्थी यांनी शक्यतो खेळासाठी योग्य असा पोशाख करावा.
- जिंकणाऱ्या गटाला मेजर ध्यानचंद यांच्या नावाची ट्रॉफी देण्यात यावी.
- शाळांनी त्यांच्याकडे उपलब्ध व्यवस्थे नुसार खाली दिलेल्या खेळांपैकी कोणत्याही खेळांची निवड करावी.
- आउटडोअर गेम्स - चालणे शर्यत, व्हॉलीबॉल, हॉकी, मिनी फुटबॉल, टेनिस बॉल
- इनडोअर गेम्स- खोलीतील किंवा सभागृहातील खेळ-बॅडमिंटन, बुद्धिबळ, बास्केटबॉल, टेबल टेनिस, रस्सीखेच
- फनी गेम्स - चमचा लिंबू शर्यत / पोते शर्यत, दोरीवर चढणे शर्यत, लगोरी/लंगडी, फळी आव्हान.
सदर क्रीडा दिनाच्या दिवशी सोबत जोडलेल्या भारत सरकार शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली, यांच्या परिपत्रकातील फिट इंडिया ची शपथ सर्व विद्यार्थी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी म्हणावी.
क्रीडा दिन आयोजित करण्याबाबतच्या आणि साजरा केल्यानंतरच्या बातम्या स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये किंवा पोस्ट स्वरूपात जास्तीत जास्त सामाजमाध्यमांवर शेअर कराव्यात.
शाळांनी फिट इंडिया पोर्टलवर https://fitindia.gov.in किंवा फिट इंडियामोबाईल अॅपवर आपल्या शाळेतील उपक्रमांची माहिती, फोटो व व्हिडीओ अपलोड करावेत. [परिपत्रक येथे पहा]
महाराष्ट्रातील एकमेव शिक्षिका यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ जाहीर