New Education Policy 2023 : मुलांसाठी नवीन शिक्षण पद्धत लवकरच लागू होणार! राज्य शैक्षणिक आराखडा तयार....

New Education Policy 2023

New Education Policy 2023 : पायाभूत स्तरावरील शैक्षणिक आराखड्यासाठी उपसमितीला मंजुरी; पाठ्यक्रम लवकर तयार होण्यासाठी सदस्यांनी सक्रिय योगदान देण्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आवाहन केले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत राज्याचा शैक्षणिक आराखडा तयार करण्यासाठी सुकाणू समिती गठित करण्यात आली आहे. त्याचा एक भाग म्हणून पायाभूत स्तरावरील (अंगणवाडी/ बालवाडीची तीन वर्षे आणि इयत्ता पहिली व दुसरी) आराखडा तयार करण्यासाठी तज्ज्ञांची उपसमिती तयार करण्यात आली आहे. 

या उपसमितीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. नियोजनाप्रमाणे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आराखडा अंतिम होण्यासाठी तज्ज्ञ समिती सदस्यांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन मंत्री श्री.केसरकर यांनी केले.

राज्य शैक्षणिक आराखड्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण व्हावे आणि चालू वर्षीच पूर्व प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना पाठ्यक्रम उपलब्ध व्हावा, असे आवाहन करून मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या अभ्यासक्रमाला आधारभूत मानण्यात यावे. त्याचप्रमाणे पहिल्यांदाच शाळेत येणाऱ्या बालकांना सहज शिकता येण्याजोगा रंग, आकार, अंक अशा बाबींचा त्यात समावेश असावा. यासाठी समिती सदस्यांनी सक्रिय सहभाग घेऊन शक्य तितक्या लवकर आराखडा आणि पाठ्यक्रम निश्चित करण्याचे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्याची पायाभूत स्तर, शालेय शिक्षण, शिक्षक शिक्षण आणि प्रौढ शिक्षण अशा चार टप्प्यांमध्ये निर्मिती करण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर राज्य शैक्षणिक आराखडा तयार करण्यात येत आहे. यातील पायाभूत स्तरावरील आराखड्यासाठी तज्ज्ञांची उपसमिती तयार करण्यात आली असून शालेय शिक्षणस्तरावरील राज्य शैक्षणिक आराखड्यासाठी तज्ज्ञांची उपसमिती नेमण्यास सुकाणू समितीच्या आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ही उपसमिती तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी अशा तीन टप्प्यांमध्ये आराखडा तयार करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. {समिती शासन निर्णय}

कंत्राटी कर्मचारी लेटेस्ट न्यूज वाचा - सरकारी कर्मचारी बातम्या

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे ठळक यश; या टॉप 10 उपक्रमांची स्थिती काय?

सर्वप्रथम मंत्री श्री.केसरकर यांनी चांद्रयान-3 च्या यशामुळे देशाला अभिमान वाटावा, अशी कामगिरी केल्याबद्दल “इस्त्रो”च्या सर्व शास्त्रज्ञांसह त्यासाठी सहकार्य लाभलेल्या सर्वांचे अभिनंदन केले. इस्त्रोमार्फत यापुढे हाती घेण्यात येत असलेल्या सर्व मोहिमांसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. {चांद्रयान-3 रोव्हर लँडरवरून चंद्राच्या पृष्ठभागावर कसे उतरले ते येथे पहा}

हे ही वाचा -आरोग्य विभाग मेगा भरती जाहिरात (ऑनलाईन अर्ज) डायरेक्ट लिंक येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील एकमेव शिक्षिका यांना यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’

शैक्षणिक अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post