Ssc Hsc Result 2023 : अखेर! दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार, येथे पहा तुमचा निकाल, डायरेक्ट लिंक..

Maharashtra Board Ssc Hsc Result : जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या (दि २८) रोजी जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी कळविले आहे.

दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

Maharashtra Board Ssc Hsc Result

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) पुरवणी लेखी परीक्षा दिनांक १८ जुलै, २०२३ ते दिनांक १ ऑगस्ट, २०२३ व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) ची पुरवणी लेखी परीक्षा दिनांक १८ जुलै, २०२३ ते ८ ऑगस्ट, २०२३ व माहिती तंत्रज्ञान, सामान्यज्ञान या विषयांची ऑनलाईन परीक्षा दिनांक ९ व १० ऑगस्ट २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.

तथापि परीक्षा कालावधीत दिनांक २०/७/२०२३ रोजी व दिनांक २८/७/२०२३ रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला होता. त्यानुसार शासनाने शाळांना सदर दिवशी सुट्टी जाहीर केलेली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यात दिनांक २०/७/२०२३ रोजी असलेल्या इयत्ता १२ वी च्या विषयाची परीक्षा दिनांक ११/८/२०२३ रोजी व इयत्ता १० वीच्या विषयाची परीक्षा दिनांक ०२/०८/२०२३ रोजी घेण्यात आली. तसेच २८/७/२०२३ रोजी असलेल्या इयत्ता १० वी च्या विषयाची परीक्षा दिनांक ०३/०८/२०२३ रोजी घेण्यात आली.

सदर परीक्षेचा निकाल जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या (दि २८) रोजी जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी कळविले आहे.

कंत्राटी कर्मचारी लेटेस्ट न्यूज वाचा - सरकारी कर्मचारी बातम्या

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर सोमवार, दिनांक २८/०८/२०२३ रोजी दुपारी ०१.०० वाजता जाहीर करण्यात येत आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.

ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन इ.१० वी साठी (http://verification.mh- ssc.ac.in) व इ.१२ वी साठी (http://verification.mh-hsc.ac.in) स्वतः किंवा शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी मंगळवार, दिनांक २९/०८/२०२३ ते गुरूवार, दिनांक ०७/०९/२०२३ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/ Credit Card/ UPI / Net Banking) याद्वारे भरता येईल. परिपत्रक

दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल येथे पहा डायरेक्ट लिंक.

SSC Exam Result 2023 - निकाल असा चेक करा 

 • Step 1: सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईट (लिंक पुढे दिलेल्या आहेत) (SSC Exam Result 2023 Official Website) ला भेट द्या - बोर्ड वेबसाईट - www.mahresult.nic.in  त्यानंतर
 • Step 2 : वेबसाईट ओपन झाल्यानंतर तिथे तुमचा SSC Exam Roll No (Seat No) टाका त्यानंतर
 • Step 3 : तुम्हच्या आईचे नाव टाका जे कि, तुम्ही बोर्डाचा फॉर्म भरताना जी स्पेलिंग आईच्या नावाची टाकली असेल ते टाका , जर आईचे नाव टाकले नसल्यास  'XXX' असे टाका  (Enter 'XXX' if mother's name is not mentioned in the form)
HSC Exam Result Date 2023
 • Step 4 : आता View Result या बटनावर क्लिक करा तुमचा निकाल स्क्रीन वर दिसेल  (सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा..!! )
 • Step 5 :  तुमचा निकाल PDF मध्ये Save करा आणि प्रिंट करा 
 • तलाठी भरती परीक्षेचा यंदाचा कट ऑफ निकाल किती पर्यंत जाईल? जाणून घ्या


  दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल येथे पहा

  हे ही वाचा - महाराष्ट्र शासन सार्वजनिक सुट्ट्या 2023 PDF यादी 'येथे' डाउनलोड करा 

  मुलांसाठी नवीन शिक्षण पद्धत लवकरच लागू होणार!

  शैक्षणिक अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

  Previous Post Next Post