11th admission इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रिया संदर्भात शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य यांचे महत्त्वाचे अपडेट

सध्याची कोरोना परिस्थिती मुळे परीक्षा रद्द झालेल्या आहेत , त्यातच पुढील जून महिना म्हणजे नविन प्रवेश प्रक्रिया , शाळा , कॉलेज सुरू होण्याची चाहूल विद्यार्थी , पालक , शिक्षक सर्वांनाच लागते. मात्र यंदा देखील वेळेत शाळा किंवा कॉलेज सुरू होतील की नाही हे सध्या तरी सांगणे कठीण आहे. 

इयत्ता 11 वी चे प्रवेश प्रक्रिया राज्यातील सहा महानगर क्षेत्रातील मुंबई एम एम आर , पुणे , पिंपरी चिंचवड महानगरपालिका ,नागपूर , नाशिक, औरंगाबाद व अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 11 वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने करण्यात येतात. आणि उर्वरित जिल्ह्यातील प्रवेश स्थानिक पातळीवरून केले जातात. साधारणपणे इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रिया सुरू होते.


सन- 2021/22 मधील इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रियेबाबत कोणतीही कार्यपद्धती अद्याप अंतिम करण्यात आलेली नाही. तथापि काही उच्च माध्यमिक विद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया बाबत  गुगल फॉर्म सारख्या सामाजिक माध्यमांद्वारे अर्ज मागवणे सुरू केले आहे. असे निदर्शनास आले आहे. 

याबाबत पालक, विद्यार्थ्यांच्या मनात सम्रभ निर्माण होऊ शकतो. याबाबत पालक , विद्यार्थ्यांची दिशाभूल होऊ नये , याची काळजी घ्यावी.{alertWarning}

यासंदर्भात शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, यांनी लेखी पत्र काढून कळविले आहे.

इयत्ता 11 वी प्रवेश परीक्षा संदर्भात शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडील पत्र डाउनलोड करा.

सन-2021-22 मधील प्रवेश प्रक्रियेसाठी सविस्तर दिशानिर्देश , शासन आदेश प्राप्त झाल्यानंतर कळविण्यात येतील.

शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी जाणून घेण्यासाठी EDU News या वेबसाईटला अवश्य follow करा.

EDU News आता Whatsapp वर अपडेट मिळवण्यासाठी Edu News गृप जॉईन करा.

{getButton} $text={Join WhatsApp group} $icon={Icon Name} $color={#32CD32} 

Previous Post Next Post