प्रत्येक विद्यार्थ्यांचे शिक्षण सुलभ व्हावे , लहान वयोगटातील मुलांना आनंददायी शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांच्या क्षमता , गरजा लक्षात घेऊन परिस्थिती नुरूप शिक्षण पध्दती मध्ये बदल करावे लागते.
पपेट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शिक्षण How puppets can be used in education?
हसत खेळत अध्ययन-अध्यापन घडले की विद्यार्थी देखील मनापासून शिकतात. महाराष्ट्र समावेशित शिक्षण व्यावसायिक संघ म्हणजेच MAIEP द्वारा आयोजित 87 व्या ऑनलाईन सत्रामध्ये पपेट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शिक्षण या विषयावर वेबिनार आयोजित केले आहे.
पपेट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शिक्षण या विषयावर डायट नाशिक येथील अधिव्याख्याता मा. डॉ.संगीता महाजन हे मार्गदर्शन करणार आहेत. याचा सर्व शिक्षक , विद्यार्थी ,पालक ,पर्यवेक्षकीय यंत्रणा सर्वांनाच या वेबिनाराचा लाभ होणार आहे. तेव्हा अवश्य जॉईन व्हा.
विषय- पपेट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी आनंददायी शिक्षण
मार्गदर्शक- मा. डॉ.संगीता महाजन , अधिव्याख्याता डायट नाशिक
दिनांक- 13 जून 2021
वेळ- सकाळी ठीक 11 वाजता
युट्यूब लाईव्ह लिंक - https://youtu.be/L8DNxnViQgQ