महाराष्ट्र समावेशित शिक्षण व्यावसायिक संघाचा वर्षपूर्ती सोहळा संपन्न | Maharashtra Association of Inclusive Education Professional (MAIEP)

महाराष्ट्र समावेशित शिक्षण व्यावसायिक संघाचा वर्षपूर्ती सोहळा संपन्न | Maharashtra Association of Inclusive Education Professional (MAIEP)

कोव्हीड 19 मध्ये संपूर्ण जगभरात कोरोनाने जनजीवन विस्कळीत झाले. देशभरात गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहे. पण शिक्षण सुरू राहण्यासाठी आपण शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटक वेगवेगळ्या माध्यमातून ऑनलाईन/ऑफलाईन विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. गतवर्षी  लॉक डाऊन मध्ये या परिस्थितीत समावेशित शिक्षण सुरु राहण्यासाठी समावेशनास गति मिळावी, शिक्षण प्रक्रियेत खंड पडू नये, यासाठी काय करता येऊ शकेल? या संधीचा उपयोग घेऊन समावेशनाकडून शिक्षणाकडे या तत्वांवर मार्गक्रमण व विचार मंथन करणारा शैक्षणिक समूह तयार करण्यात आला. महाराष्ट्र समावेशीत शिक्षण व्यावसायिक संघ हा समावेशीत शिक्षण (Inclusive Education) क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यावसायिकांनी एकत्र येऊन केलेला समूह आहे. 

MAIEP ची ध्येय / उद्दिष्टे ठरवण्यात आली , त्यानुसार आज वर्षपूर्ती संपन्न होत असताना ८९ सत्र MAIEP च्या व्यासपीठावर यशस्वी पणे संपन्न झाली आहे. २१ व्या शतकातील माहिती तंत्रज्ञानाचा ICT प्रभावी वापर यासाठी करता आला. सुरुवातीला फेसबुक LIVE त्यानंतर MAIEP YouTube Channel च्या माध्यमातून शाळा स्तर ते राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख  तज्ञ मार्गदर्शकांचे सेशन आयोजित करण्यात आले.  MAIEP स्थापन होऊन आज  एक वर्ष पूर्ण झाले यानिमित्ताने वर्षपूर्ती सोहळ्यास शुभहस्ते मा. डॉ. नेहा बेलसरे, संचालक, महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा) औरंगाबाद, तथा उपसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे महाराष्ट्र, यांच्या हस्ते MAIEP Website चे उद्घाटन करण्यात आले. हा  ऐतिहासिक अविस्मरणीय वर्षपूर्ती सोहळा MAIEP YouTube Channel वर आपण पाहू शकता.



Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा