पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ % ने कमी | 1st to 12th syllabus २५% reduced
कोरोना मुळे यंदाही चालू शैक्षणिक वर्षात अद्याप शाळा सुरु झालेल्या नाहीत. गतवर्षी देखील वर्षभर शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. या धर्तीवर ऑनलाईन/ऑफलाईन शिक्षणाचा विचार करता 25% अभ्यासक्रम कमी करण्यात आला होता.
यंदाही शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये इयत्ता 1 ली ते 12 विचा अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गतवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता इ. १ ली ते इ. १२ वीपर्यंतचा २५% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
> १० वी नंतरच्या करियर च्या संधी
> JNVST Class-VI Download Admit Card Click Here
कोरोनामुळे यंदाही शाळा वेळेत सुरु न करता आल्याने विहित वेळेत पाठ्यक्रम पूर्ण व्हावा व तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना त्यांची शिक्षणातील उद्दिष्टे साध्य करता यावीत, याअनुषंगाने हा निर्णय घेतला आहे.
कमी केलेल्या पाठ्यक्रमाची तपशीलवार माहिती @scertmaha लवकरच जाहीर करेल. अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना. वर्षाताई गायकवाड यांनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून दिली आहे.
EduNews या शैक्षणिक वेबसाईटवरील ताज्या घडामोडी सोबत अपडेट राहण्यासाठी whatsapp Group join करा.