झूम ऑनलाईन मिटिंग मध्ये मोबाईल मधून PPT PDF Exal Sheet शेयर कशी करायची? | How to share screen on Zoom using mobile in marathi

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अजूनही शाळा, कॉलेज , शासकीय , निमशासकीय, खाजगी कार्यालय पूर्ण क्षमतेने सुरु झालेले नाहीत, मात्र अशा परिस्थितीत ऑनलाईन क्लास, ऑनलाईन मिटिंग , होम स्कूलिंग , व्हर्च्युअल पद्धतीने व्हिडिओ कॉन्फरन्स मिटींग्स सुरु आहे. दरम्यान आपण Google Meet असेल किंवा Zoom Could Meeting यामध्ये सहभागी होत असतो. आपले अनुभव , विचार , PPT, PDF,  Exal Sheet किंवा Photo , Video द्वारे ऑनलाईन मिटिंग शेयर करावे लागतात. आणि सर्व विशेषतः मोबाईल मधून शेयर करताना आपणास अडचणी येतात. मात्र आज आपण अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने झूम ऑनलाईन मिटिंग मध्ये मोबाईल मधून PPT, PDF, Exal Sheet किंवा Photo , Video शेयर कशी करावी? हे पाहूया. 

{tocify} $title={Table of Contents}

झूम ऑनलाईन मिटिंग मध्ये मोबाईल मधून PPT,PDF,Exal Sheet शेयर कशी करायची? | How to share screen on Zoom using mobile in marathi

याठिकाणी अत्यंत सोप्या पद्धतीने आपणास PPT,  PDF ,Exal Sheet SHERE कशी करता येईल , यासाठी आपण खालील स्टेप follow करा. जेणेकरून आपण सहजपणे आपल्या ऑनलाईन मिटींग्स मध्ये  PPT, PDF, Exal Sheet शेयर करू शकाल.

पूर्वतयारी

आपणास जे काही PPT,PDF,Exal Sheet ऑनलाईन मिटिंग मध्ये दाखवायची आहे. ते सर्व आपल्या Whatsapp वर घ्या. 

म्हणजे सर्व फाईल कुटुंबातील किंव मित्र/मैत्रणी यांच्या Whatsapp नंबर वर सेंड करून ठेवा. 

ज्यावेळी आपण ऑनलाईन मिटिंग मध्ये PPT,PDF,Exal Sheet शेयर करणार असाल तेव्हा आपण ज्यांना Whatsapp वर फाईल पाठवून ठेवल्या आहे. त्यांच्या Whatsapp वर जाऊन शेयर करा.


ऑनलाईन मिटिंग मध्ये PPT,PDF,Exal Sheet शेयर करण्यासाठी खालील स्टेप follow करा.


How to share screen on zoom using mobile in marathi

Step 1

>  ऑनलाईन मिटिंग मध्ये जेव्हा आपणास PPT,PDF,Exal Sheet डॉक्युमेंट्स शेयर करायचे आहे. तेव्हा झूम च्या स्क्रीन वर खालच्या बाजूस मध्यभागी (ग्रीन कलर मध्ये) SHARE  चे बटन आहे. (डाव्या बाजूस MIC आणि त्या बाजूस VIDEO आणि त्याच्या बाजूलाच SHARE बटन आहे.) त्यावर क्लीक करा.

Step 2

SHARE बटन वर क्लिक केल्यानंतर आपणास Microsoft Onedrive ,Google Drive, Box, Photo Document असे ऑप्शन दिसेल. त्यानंतर स्क्रीन वर स्क्रोल करा. आपणास Web URL, Bookmark Screen , Camera, Share Whiteboard हे ऑप्शन दिसतील यामधील Screen या ऑप्शन वर क्लिक करा. 

Step 3

>  Screen या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर एक पॉपअप येईल जो आपणास खाली दिलेल्या फोटोत दाखवले आहे. त्यामध्ये Start now  या बटनावर क्लिक करा.

Step 4/5

> Start now  या बटनावर क्लिक केल्यानंतर जर आपण पहिल्यांदाच डॉक्युमेंट शेयर करत असाल तर स्क्रीन वर सेटिंग on करण्याची परमिशन मागेल. परमिशन सेटिंग ऑन करा. त्यामध्ये Allow display over other apps यावर क्लिक करा. (यापूर्वी परमिशन दिली असल्यास Start now  या बटनावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट स्क्रीन शेयर होईल.) आता आपल्या मोबाईलची स्क्रीन शेयर झाली आहे.

Step 6

> आता - आपण ज्यांना Whatsapp वर फाईल पाठवून ठेवल्या आहेत. त्यांच्या Whatsapp ला जा आणि PPT, PDF, Exal Sheet फाईल शेयर करा.


> सुरवात करण्यापूर्वी मोबाईल रोटेड मोड मध्ये ठेवा. (आडवी स्क्रीन) ऑन करा. आणि सादरीकरणास सुरुवात करा. आपणास खूप खूप शुभेछ्या !

Step 7

> सादरीकरण संपल्यानंतर झूम च्या स्क्रीन वर या आणि Stop Share या रेड झालेल्या बटनावर ओके करा. आता तुमची स्क्रीन शेयारिंग थांबलेली आहे.

समावेशित शिक्षण वेबसाईट ला अवश्य भेट द्या.

हे ही वाचा

बोनस टीप 

आपणास जर संपूर्ण Whatsapp Contact Chat लपवायचे असेल तर स्क्रीन शेयर करण्यापूर्वी ज्यांना आपण Share करण्याच्या फाईल पाठवून ठेवल्या आहेत. त्यांचे Whatsapp  ओपन करून ठेवा. आणि  Whatsapp  मधून डायरेक्ट होम बटन प्रेस करून बाहेर या.  म्हणजे ज्यावेळी आपण स्क्रीन शेयर कराल तेव्हा डायरेक्ट तुम्ही Whatsapp ओपन केल्यानंतर त्या फाईल शेयर करू शकाल.

ऑनलाईन मिटिंग जर जास्त वेळ चालणार असेल तर शक्यतो आपला मोबाईल एका जागेवर स्टेबल ठेवा. कारण मोबाईल सारखा हातात असल्याने स्क्रीन वर चुकून टच होते आणि मध्ये आपला माईक सुरु होतो आणि मग आपण जे बोलत असतो. आजूबाजूचा सर्व आवाज मिटिंग मध्ये जॉईन असणारया सर्वाना ऐकायला जाते. त्यामुळे चुकून आपल्याकडून एखादा अपशब्द किंवा घरातील आवाज , हसण्याचा आवाज, आपण मिटिंग मध्ये ज्यांच्या बद्दल बोलतो त्यांना देखील हे सर्व ऐकायला जाते. त्यामुळे शक्यतो मोबाईल स्टेबल ठेवा किंवा माईक चालू होणार नाही याची काळजी  घ्या. 

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२१-२२

>   SCERT स्वाध्याय  उपक्रमा काही प्रमाणात बदल करण्यात आला आहे. कोणता बदल झाला आहे? वाचण्यासाठी क्लिक करा.


Edu News
Edu News या Telegram चॅनेल वर आपणास शालेय शिक्षणासंबंधीत सर्व शैक्षणिक बातम्या (Educational News) वाचायला मिळतील. तेव्हा अवश्य जॉईन व्हा.Previous Post Next Post