नवोपक्रम स्पर्धा सन 2021 22 | scert innovation 2021-22

नवोपक्रम स्पर्धा सन 2021 22 | scert innovation 2021-22


scert innovation 2021-22


शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व शिक्षण यंत्रणेतील घटक नवोपक्रम राबवित असतात. 

त्यामध्ये कोरोना काळात तर ऑनलाईन/ऑफलाईन शिक्षण मुलांपर्यंत कशा पद्धतीने पोहचवता येऊ शकते? याचे नवनविन उपक्रम शिक्षकांनी हाती घेतलेले आहे. 

याचाच एक भाग म्हणजे आपण राबवित असलेले नवोपक्रम हे राज्यातील इतर ठिकाणी देखील मुलांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी वापरता येऊ शकते. 

नवोपक्रम हा एक प्रकारे शिक्षणातील आव्हाने कमी करण्यासाठी चा मार्ग आहे. 

महाराष्ट्र TET परीक्षा 2021 वेळापत्रक

महाराष्ट्र TET परीक्षा 2021

चालू शैक्षणिक वर्षात NAS सर्वेक्षण देखील होणार आहे. सोबतच गेल्या वर्षभरापासून विद्यार्थी शाळेपासून वंचित आहे. 

शिक्षण क्षेत्रातील सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१-२२ आयोजित करण्यात येणार आहे.

दरवर्षी साधारणपणे माहे ऑक्टोबर/नोव्हेंबर मध्ये नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील नवोपक्रम स्पर्धा ऑक्टोबर/नोव्हेंबर मध्ये याबाबत सविस्तर पणे कळविण्यात येणार आहे.

 नवोपक्रम स्पर्धा सन 2021 22 | scert Innovation 2021-22 विषय 

  • विद्यार्थ्यांचा अध्ययन ऱ्हास ( Learning Loss) भरून काढण्यासाठी सध्या सेतू अभ्यासक्रम (Bridge Course) राबविण्यात येत आहे. 
  • नवोपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अध्ययन ऱ्हास Learning loss भरून काढण्यासाठी नवनवीन उपक्रम हाती घेत आहोत. असे नवोपक्रम या स्पर्धेसाठी सादर करावेत. 
  • याबरोबरच NEP २०२० नुसार या वर्षी राज्यातील विद्यार्थ्यांची पायाभूत भाषिक व अंकगणितीय साक्षारता (FLN) करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच या वर्षी नोव्हेंबर २०२१ मध्ये NAS देखील होणार आहे. 
  • या सर्व पार्श्वभूमीवर या वर्षी पायाभूत भाषिक व अंकगणित साक्षरता (FLN) तसेच इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती तसेच माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता साध्य करण्यावर भर देणारे नवोपक्रम राबविण्याबाबत वरीष्ठ स्तरावरून कळविण्यात आले आहे.


राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२०-२१ साठी नवोपक्रम सादर करण्याकरिता ऑक्टोबर २०२१ मध्ये स्वतंत्रपणे लिंक व माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे.

सर्व नवोपक्रमशील शिक्षक तसेच अधिकारी यांना खूप खूप शुभेछ्या !


> नवोपक्रम लेखन या विषयाला अनुसरुन YouTube वेबिणार पाहण्यासाठी अवश्य भेट द्या.

> इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2020-21 जाहीर



EduNews या शैक्षणिक वेबसाईटवरील ताज्या घडामोडी सोबत अपडेट राहण्यासाठी whatsapp Group join करा.

Edu News
Edu News या Telegram चॅनेल वर आपणास शालेय शिक्षणासंबंधीत सर्व शैक्षणिक बातम्या (Educational News) वाचायला मिळतील.



Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा