महाराष्ट्र TET परीक्षा 2021 जाहीर | tet exam date 2021 maharashtra

महाराष्ट्र TET परीक्षा 2021 जाहीर | tet exam date 2021 maharashtra


“बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९” मधील तरतूदीनुसार यापुढे सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता (इ. १ ली ते ८ वी) “शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) अनिवार्य करण्यात आली आहे.
“शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) दरवर्षी आवश्यकतेप्रमाणे (किमान एकदा) शासनामार्फत घेण्यात येते. नुकताच शासनामार्फत TET परीक्षा 2021 बाबत घोषणा करण्यात आली आहे.

TET उत्तीर्ण उमेदवारांना शासनातर्फे शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) प्रमाणपत्र देण्यात येते.

शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणवत्ता पातळीत वाढ करण्यासाठी सदर परीक्षेस कितीही वेळा प्रविष्ट होता येते.


“शिक्षक पात्रता परीक्षा” (Teacher Eligibility Test) मध्ये प्राथमिक (इ. १ ली ते ५ वी) व उच्च प्राथमिक (इ.६ वी ते ८ वी) या दोन स्तरातील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका असते. दोन्ही स्तरासाठी अर्ज करणा-या उमेदवारास दोन्ही प्रश्नपत्रिका अनिवार्य असतात .

या दोन्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व काठिण्य पातळी अनुक्रमे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमावर आधारीत असते.


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - २०२१


महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा - २०२१ (MAHATET - 2021) घेण्याची जबाबदारी शासनाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयावर सोपविलेली असून ही परीक्षा रविवार दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्याचे निश्चित केले आहे. असे प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे.

इ.१ ली ते इ.५ वी व इ.६ वी ते इ.८वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम,
अनुदानित/विना अनुदानित, कायम विना अनुदानित, इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक/शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमतः ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असते.

TET परीक्षेशी संबंधित
सर्व शासननिर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या
https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे,
परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या वेबसाईट वर देण्यात आला
आहे. 

सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. 

TET परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक ०३/०८/२०२१ पासून सुरु होत असून दि.२५/०८/२०२१ अखेरपर्यंत उमेदवारांना
ऑनलाईन अर्ज भरता येतील.
EduNews या शैक्षणिक वेबसाईटवरील ताज्या घडामोडी सोबत अपडेट राहण्यासाठी whatsapp Group join करा.

Edu News
Edu News या Telegram चॅनेल वर आपणास शालेय शिक्षणासंबंधीत सर्व शैक्षणिक बातम्या (Educational News) वाचायला मिळतील.Previous Post Next Post