सन २०२०-२१ च्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५वी) PUP व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८वी) PSS संदर्भात राज्यातील कोविडच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा होऊ शकल्या नाहीत.
दि.२३.०५.२०२१ रोजी सदर परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात आली होती. तथापि, पुन्हा कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे आणि तांत्रिक कारणास्तव सदर परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी हितास प्राधान्य देऊन सदर परीक्षा तूर्त पुढे ढकलण्यात आली होती.
इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2020-21 जाहीर | scholarship exam date 2021
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे.
कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटीच्या अधीन राहून, सदर परीक्षा दि.०८ ऑगस्ट, २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) - 2021 | Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) - 2021
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दि. ०८/०८/२०२१ रोजी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु
दि. ०८/०८/२०२१ रोजी काही जिल्ह्यांत केंद्र शासनामार्फत सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या पदासाठीची लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा
(इ. ८ वी) दि. ०८/०८/२०२१ ऐवजी दि. ०९/०८/२०२१ घेण्यात येणार आहे.
इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा 2020-21 प्रवेशपत्र डाउनलोड करा
सदर परीक्षेचे प्रवेशपत्र दि. २७/०७/२०२१ रोजी संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी आपण शाळा https://www.mscepuppss.in/ शिष्यवृत्ती वेबसाईट ला भेट देऊन शाळा लॉगिन करावे.
त्यानंतर आपल्या शाळेतील शिष्यवृत्ती साठी रजिस्टर केलेल्या मुलांचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले असून ते आपण डाउनलोड करू घ्यावे.
शिष्यवृत्ती शाळा लॉगिन करण्यासाठी येथे क्लीक करा.
https://www.mscepuppss.in/LoginPage.aspx
EduNews या शैक्षणिक वेबसाईटवरील ताज्या घडामोडी सोबत अपडेट राहण्यासाठी whatsapp Group join करा.
Edu News
Edu News या Telegram चॅनेल वर आपणास शालेय शिक्षणासंबंधीत सर्व शैक्षणिक बातम्या (Educational News) वाचायला मिळतील.