सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्स) संपूर्ण माहिती | Bridge Course announcement
कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील शाळा अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. मागील वर्षी कोरोना मुळे शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. मात्र या शैक्षणिक वर्षी विद्यार्थी पुढच्या वर्गात प्रवेश केला आहे. यासाठी मागील वर्षीच्या अध्ययन निष्पत्ती भरून काढण्यासाठी उजळणी करून घेण्यासाठी सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्स) नुकताच शिक्षणमंत्री , शिक्षण राज्यमंत्री तसेच शिक्षण विभागातील उच्च पदस्थ अधिकारी वर्ग यांच्या उपस्थितीत सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्स) चे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले आहे.
सेतू अभ्यासक्रम (ब्रीज कोर्स) स्वरूप
मागील शैक्षणिक वर्षातील अध्ययन ऱ्हास (Learning Loss) भरून काढण्यासाठी राज्यस्तरवरून विकसित करण्यात आलेला सेतू अभ्यासक्रम (Bridge course) आहे.{alertInfo}
समाविष्ट इयत्ता - 2 री ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे.
माध्यम- मराठी
समाविष्ट विषय - मराठी, इंग्रजी ,गणित, विज्ञान , सामाजिक शास्र ,
माध्यम- हिंदी
विषय- हिंदी भाषा
माध्यम- उर्दू
विषय- उर्दू भाषा
कालावधी- 45 दिवस (प्रत्येक विषयनिहाय 3 चाचणी उपलब्ध)
सुरुवात - दिनांक 1 जुलै 2021
सदरचा 'सेतू अभ्यासक्रम' 45 दिवसाचा असून , 3 चाचण्या उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इयत्ता 2 री ते 10 वी पर्यंत सदरचे सेतू अभ्यासक्रम pdf स्वरूपात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे , महाराष्ट्र (SCERT Pune) या संकेतस्थळा वर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सेतू अभ्यासक्रम PDF डाउनलोड करण्यासाठी SCERT Pune संकेतस्थळास भेट द्या.
सद्यस्थितीत मराठी माध्यमाचे विषयनिहाय व उर्दू व हिंदी माध्यम भाषा विषय अभ्यासक्रम उपलब्ध असून लवकरच इतर विषयाचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
EduNews या शैक्षणिक वेबसाईटवरील ताज्या घडामोडी सोबत अपडेट राहण्यासाठी whatsapp Group join करा.