आझादी का अमृत महोत्सव | azadi ka amrut mahotsav आझादी का अमृत महोत्सव | azadi ka amrut mahotsav
भारत सरकार आझादी का अमृत महोत्सव | AZADI KA AMRUT MAHOTSAV अंतर्गत कार्यक्रमांच्या मालिकेद्वारे स्वातंत्र्याची ७५ वी जयंती साजरी करत आहे. #AKAM या उपक्रमाची सुरुवात १२ मार्च २०२१ रोजी झाली असून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत याची अंमलबजावणी असणार आहे.सदर महोत्सव लोकसहभागाच्या (जन-भागिदारी) भावनेने लोकोत्सव (जन-उत्सव) म्हणून साजरा केला जात आहे.
आझादी का अमृत महोत्सव AKAM अंतर्गत होणारे पाच कार्यक्रम
- Freedom Struggle
- Ideas at 75
- Achievements at 75
- Actions at 75
- Resolve at 75.
> As the Nation celebrates Azadi ka Amrit Mahotsav
शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, नवी दिल्ली AKAM (azadi ka amrut mahotsav ) चा एक भाग म्हणून या काळात अनेक कार्यक्रमांचा समन्वय साधत आहे. आगामी कार्यक्रमांपैकी एक म्हणजे "राष्ट्रगीत गाणे" (rashtragaan)
"राष्ट्रगीत गाणे" (rashtragaan)
सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार तसेच पालक आणि कुटुंबातील इतर सदस्य यांना सदर कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.
सहभागाची अंतिम तारीख १४ ऑगस्ट २०२१ आहे. तत्पूर्वी सर्व सहभागी यांनी https://rashtragaan.in या वेबसाईटवर जाऊन राष्ट्रगीताचे सादरीकरण अपलोड करायचे आहे.
भारत सरकार मार्फत निवडले जाणार टॉप 100 व्हिडिओ
टीव्ही, रेडिओ, यूट्यूब आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टॉप 100 व्हिडिओ भारत सरकार मार्फत निवडले जाणार असून सोशल मिडिया वर ते दाखवण्यात येणार आहे. तरी या संधीचा अवश्य लाभ घ्या. सोबतच आपल्या मुलांना देखील स्पर्धेत सहभागी करून घ्या आणि या संधीचा लाभ द्या.
Get a chance to feature in a new song by one of India’s leading lyricist and composer. Top 100 videos will be selected for the song to be launched on TV, Radio, YouTube and Social Media platforms {alertInfo}