आझादी का अमृत महोत्सव "राष्ट्रगीत गाणे" कार्यक्रमात सहभाग घ्या आणि मिळवा भारत सरकार तर्फे प्रमाणपत्र | rashtragan certificate download

भारत सरकार आझादी का अमृत महोत्सव | AZADI KA AMRUT MAHOTSAV अंतर्गत कार्यक्रमांच्या मालिकेद्वारे स्वातंत्र्याची ७५ वी जयंती साजरी करत आहे. 

rashtragan certificate download


#AKAM या उपक्रमाची सुरुवात १२ मार्च २०२१ रोजी झाली असून १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत याची अंमलबजावणी असणार आहे.सदर महोत्सव लोकसहभागाच्या (जन-भागिदारी) भावनेने लोकोत्सव (जन-उत्सव) म्हणून साजरा केला जात आहे.

"राष्ट्रगीत गाणे" आपला व्हिडिओ सिलेक्ट झाला का? टॉप 100 व्हिडिओ येथे चेक करा.

शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, नवी दिल्ली AKAM  (azadi ka amrut mahotsav ) चा एक भाग म्हणून या काळात अनेक कार्यक्रमांचा समन्वय साधत आहे. आगामी कार्यक्रमांपैकी एक म्हणजे "राष्ट्रगीत गाणे"  (rashtragaan) 

"राष्ट्रगीत गाणे"  (rashtragaan) 

सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार  तसेच पालक आणि कुटुंबातील इतर सदस्य यांना सदर कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. 

सहभागाची अंतिम तारीख १४ ऑगस्ट २०२१ आहे. तत्पूर्वी सर्व सहभागी यांनी https://rashtragaan.in या वेबसाईटवर जाऊन राष्ट्रगीताचे सादरीकरण अपलोड करायचे आहे. 

भारत सरकार मार्फत निवडले जाणार टॉप 100 व्हिडिओ

टीव्ही, रेडिओ, यूट्यूब आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टॉप 100 व्हिडिओ भारत सरकार मार्फत निवडले जाणार असून सोशल मिडिया वर ते दाखवण्यात येणार आहे. तरी या संधीचा अवश्य लाभ घ्या. सोबतच आपल्या मुलांना देखील स्पर्धेत सहभागी करून घ्या आणि या संधीचा लाभ द्या.

Get a chance to feature in a new song by one of India’s leading lyricist and composer. Top 100 videos will be selected for the song to be launched on TV, Radio, YouTube and Social Media platforms 

Sing National Anthem and Upload Video on rashtragaan.in #AzadiKaAmritMahotsav


राष्ट्रगान (राष्ट्रगीत गाणे) या कार्यक्रमात सहभाग घेणे एकदम सोपे आहे. मोबाईल मधून आपण राष्ट्रगीत गाणे कार्यक्रमात आपला व्हिडिओ अपलोड करू शकतो. तसेच इतरांचे अपलोड झालेले व्हिडिओ देखील आपणास पाहता येतात. चला तर सहभागी होऊया राष्ट्रगान (राष्ट्रगीत गाणे) कार्यक्रमात...


राष्ट्रगान rashtragaan (राष्ट्रगीत गाणे) कार्यक्रम


राष्ट्रगान rashtragaan (राष्ट्रगीत गाणे) कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खालील स्टेप follow करा.

STEP 1

>   सर्वप्रथम https://rashtragaan.in या वेबसाईटला भेट द्या.


>  वेबसाईटवर प्रथम आपली भाषा निवडा आणि Proceed पुढे जा बटनावर क्लिक करा.

STEP 2 

> तुमचे तपशील एंटर करा यामध्ये पूर्ण नाव , वय गट , देश / क्षेत्र , राज्य निवडा आणि च्या स्तुती करू पुढे जा या बटनावर क्लिक करा.
> Microphone आणि Video (camera) परमिशन allow करा.


STEP 3

> आता तुमच्यासमोर कॅमेरा ओपन झालेला दिसेल आणि त्याखाली विक्रम करा (रेकॉर्ड करा, अपलोड करा, पुन्हा प्रयत्न करा.) हे तीन ऑप्शन  दिसतील आणि वरच्या बाजूला text दिसेल.

> प्रारंभ करण्यासाठी रेकॉर्ड दाबा. आणि राष्ट्रगान rashtragaan (राष्ट्रगीत गाणे) म्हणायला सुरुवात करा. Let us"
Sing the National Anthem. 
> राष्ट्रगीत पूर्ण झाल्यानंतर अपलोड करा यावर क्लिक करा.
> अपलोड झाल्यानंतर uplod completed वर क्लिक करा.

STEP 4

> प्रमाणपत्र डाउनलोड करा

अशा पद्धतीने आपण राष्ट्रगान (राष्ट्रगीत गाणे) या कार्यक्रमात सहभाग घेऊन प्रमाणपत्र मिळवू शकता आणि जर आपला व्हिडिओ टॉप 100 मध्ये निवडला गेल्यास १५ ऑगस्ट रोजी भारत सरकार मार्फत सोशल मिडिया वर दाखवण्यात येईल. 

सर्वांना आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या शुभेछ्या !





> १५ ऑगस्ट निमित्ताने इयत्ता १ ली ते १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन इयत्ता निहाय कार्यक्रमाचे नाव , विषय व तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Previous Post Next Post