KBC 2021: कोण होणार करोडपती जिल्हा परिषद शिक्षक पवन आडवळे यांना हॉट सीट वर बसण्याची मिळाली संधी

'कौन बनेगा करोडपती' हा हिंदी लोकप्रिय कार्यक्रम आपल्याला माहित आहे. यामध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात. तर मराठी कार्यक्रमाचे या पर्वाचे म्हणजेच 'कोण होणार करोडपती' kon honaar crorepati 2021 या मराठी पर्वाचे कार्यक्रमातील सूत्रसंचालन आपल्या देहबोली मुळे आणि आवाजामुळे सर्वांना परिचित सचिन खेडेकर हे लाडके अभिनेते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात.

kon honaar crorepati 2021 marathi


ज्ञानाच्या जोरावर पैसे जिंकण्याची संधी देणारा कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती' हा लोकप्रिय कार्यक्रम सोनी मराठी (SONY मराठी) या टिव्ही चॅनेल वर रात्री नऊ वाजता असतो.  याच कार्यक्रमामध्ये रायगड जिल्हा परिषद शाळेतील एका दुर्गम भागातील शाळेत काम करणारे शिक्षक पवन आडवळे यांना सोनी मराठी टीव्ही वरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'कोण बनेगा करोडपती' कार्यक्रमांमध्ये हॉट सीटवर बसण्याची त्यांना संधी मिळाली आहे. आणि हा सदरचा कार्यक्रम २३ ऑगस्ट २०२१ आणि २४ ऑगस्ट २०२१ रोजी सोनी मराठी टीव्ही वर  या कार्यक्रमाचे प्रक्षेपण होणार आहे. आडवळे गुरुजी करेल का 25 लाखांचा टप्पा पार? पहा रात्री ९ वाजता सोनी मराठी कार्यक्रमात 'कोण होणार करोडपती'...

>> SCERT स्वाध्याय आठवडा ६ वा | पाचव्या आठवड्यामध्ये राज्यभरातून १३ लाख विद्यार्थ्यांचा सहभाग

'कोण होणार करोडपतीचे' LIVE एपिसोड बघण्यासाठी सोनी मराठी टीव्हीवर रात्री 9 वाजता कार्यक्रम पाहता येतो. आणि मोबाईलवर बघायचे असेल तर जिओ टीव्ही हे अॅप मोबाईलवर डाउनलोड करावे. एकदा हे अॅप डाऊनलोड करून लॉग इन केलं की हा कार्यक्रम टीव्हीवर पाहायची गरज नाही. आरामात कधीही, कुठेही हा शो तुम्ही पाहू शकाल.

'कोण होणार करोडपती' कार्यक्रमाचे स्वरूप

'कोण होणार करोडपती' कार्यक्रमामध्ये एकदा का हॉट सीटवर बसण्याची संधी मिळाली, की मग हॉट सीटवर बसल्यानंतर लाडके अभिनेते सचिन खेडेकर हे स्पर्धकाला संपूर्ण कार्यक्रमात एकूण १ कोटी जिंकण्यासाठी साठी पंधरा प्रश्न विचारले जातात. आणि या पंधरा प्रश्नांचे स्पर्धकाने जर संपूर्ण 15 प्रश्नांची अचूक उत्तरे दिली तर स्पर्धक एक कोटी रुपयाचे बक्षीस जिंकतो.

  • सुरुवातीच्या प्रश्नांची प्रतिप्रश्न 30 सेकंदाची मर्यादा असते. 
  • कोण होणार करोडपती या खेळा मध्ये एकूण तीन लाईफ लाईन स्पर्धकाला मिळतात.
  • 50% चा फॉर्म्युला म्हणजे दोन चुकीचे पर्याय काढून टाकण्यात येतात. आणि शेवटी दोन पर्यायांमधून अचूक उत्तर निवडावे लागते.
  • फोन अ फ्रें - फोन अ फ्रेंड या लाईफ लाईन मध्ये स्पर्धकाला आपल्या आवडीच्या तीन मित्रांची कॉन्टॅक्ट नंबर आधीच द्यावी लागतात आणि ज्यावेळी फोन अ फ्रेंड ही लाइफलाइन वापरायचे असते. तेव्हा स्पर्धक आपल्या आवडीच्या कोणत्याही परिचित व्यक्तीस फोन कॉल द्वारे मदत घेऊ शकतो. यासाठी देखील सेकंदाची मर्यादा असते.
  • प्रेक्षक मतदा- प्रेक्षक मतदान या लाईफ लाईन मध्ये स्पर्धकाला विचारलेल्या प्रश्नावर प्रेक्षक मतदान करतात. आणि त्यांच्या आवडीनुसार पर्याय निवडतात. याची मदत स्पर्धक घेऊ शकतो.
  • कार्यक्रमाच्या कोणत्याही क्षणी जिंकलेली रक्कम घेऊन कार्यक्रम मध्येच सोडण्याचे सामर्थ्य हे पूर्णपणे स्पर्धेकडे असतं.

#konhonaarcrorepati2021 

'शिक्षण मित्र' या शैक्षणिक वेबसाईट वरील ताज्या घडामोडी सोबत अपडेट राहण्यासाठी whatsapp Group join करा.






शैक्षणिक अपडेट साठी 'शिक्षण मित्र' सोशल मिडीयाला फॉलो करा 



Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा