Breaking Edu News : राज्यात १७ ऑगस्ट पासून होणार शाळा सुरु मार्गदर्शक सूचना जारी

Breaking Edu News : राज्यात १७ ऑगस्ट पासून होणार शाळा सुरु मार्गदर्शक सूचना जारी 

shala kadhi suru honar 2021


शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील शहरी भागात ८वी ते १२ वी व ग्रामीण भागातील ५ वी ते ७ वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या काही भागात कमी झालेला दिसून येत आहे. त्यानुषंगाने दिनांक १७ ऑगस्ट, २०२१ पासून राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते ७ वी चे वर्ग व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आली आहे. 

SCERT स्वाध्याय आठवडा ४ था सुरु | सराव करण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबई,मुंबई उपनगर,ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेवून शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आले असून, दिनांक २ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या ब्रेक द चेन मधील सुधारीत मार्गदर्शक सूचनानूसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर जिल्ह्यातील कोविड परिस्थिती विचारात घेवून व अन्य जिल्ह्यांबाबत देखील शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.


शाळा सुरु करण्याबाबत संपूर्ण मार्गदर्शक सूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

> शिष्यवृत्ती परीक्षा २०२१ 

SCERT स्वाध्याय लिंक

Previous Post Next Post