१५ ऑगस्ट निमित्ताने इयत्ता १ ली ते १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

१५ ऑगस्ट निमित्ताने इयत्ता १ ली ते १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन 

दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे संपूर्ण देशामध्ये आपण १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतो. 



यावर्षी भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७४ वा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने क्रांतिवीरांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण व्हावी अशा विविध उद्देशांनी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

SCERT स्वाध्याय लिंक

SCERT स्वाध्याय आठवडा ४ था सुरु | सराव करण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यामध्ये दिवसभरात वृक्षारोपण, अंतर शालेय/ अंतर महाविद्यालय यांच्या स्तरावर ऑनलाईन पद्धतीद्वारे वाद-विवाद स्पर्धा, प्रश्न मंजुषा/देशभक्तीपर निबंध व कविता. चित्रकला स्पर्धा, देशभक्तीपर गीत गायन, वकृत्त्व स्पर्धा, स्वतंत्र्य संग्रामाच्या दुर्मिळ छायाचित्रांचे संकलन अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ ऑफलाईन स्वरूपात आयोजन करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काढलेल्या परिपत्रका द्वारे कळविण्यात आले आहे.

कार्यक्रमांचे आयोजन करून त्याचे व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य इ. विविध समाज माध्यमे उदा. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्वीटर इ. वर upload करताना #स्वातंत्र्यदिन२०२१#IndependenceDayIndia2021 या HASHTAG (#) वर upload करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

आझादी का अमृत महोत्सव "राष्ट्रगीत गाणे" कार्यक्रमात सहभाग घ्या आणि मिळवा भारत सरकार तर्फे प्रमाणपत्र 


सदर कार्यक्रमांचे आयोजन करत असताना कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घ्यावी.

इयत्ता निहाय कार्यक्रमाचे नाव , विषय व तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग परिपत्रक डाउनलोड करा.


Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा