५ सप्टेंबर हा दिवस देशभरात दरवर्षी 'शिक्षक दिन' म्हणून उत्साहात साजरा केला जातो. शिक्षण क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर हा दिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.
शिक्षक दिनानिमित्त गतवर्षी सन २०२०-२१ मध्ये Thank A Teacher हे अभियान राबविण्यात आले होते. यावर्षी देखील शिक्षकांचा गौरव करण्यासाठी #Thank A Teacher अभियानांतर्गत 'शिक्षक कार्य गौरव' सप्ताह साजरा करण्याबाबत 'शालेय शिक्षण' विभागाने कळविले आहे.
'शिक्षक कार्य गौरव' सप्ताह कालावधी Thank A Teacher
विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आणि विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्न करत आहेत. अशा सर्व शिक्षकांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने दि.०२ सप्टेंबर २०२१ ते ०७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत #ThankATeacher अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे.
कोरोना कालावधीतील लोकप्रिय शैक्षणिक उपक्रम
इयत्ता १ ली ते १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन
सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते १२ वी मधील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात बाबत कळविण्यात आले आहे. त्यामध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन, काव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करावे. तसेच शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात यावा, यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्याबाबत मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षकांच्या कार्य गौरव प्रित्यर्थ कार्यक्रम तपशील
दि.०२ सप्टेंबर २०२१ ते ०७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत #ThankATeacher अभियानांतर्गत 'शिक्षक कार्य गौरव' सप्ताह मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करावे.
@ टॅग व हॅशटॅग (#)
सदर कार्यक्रमांचे आयोजन करून त्याचे व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य सोशल मिडिया Facebook, Twitter, Instagram वर Facebook- @thxteacher, Twitter-@thxteacher, Instagran-@thankuteacher अशा प्रकारे टॅग करुन अपलोड करावेत. सोबतच खालील हॅशटॅग (#) चा वापर करावा.
#ThankATeacher
#ThankYouTeacher
#MyFavouriteTeacher
#MyTeacherMyHero
#ThankATeacher2021
हॅशटॅग (#) देताना मध्ये स्पेस देऊ नये.